CinemaHead linesWomen's World

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – हिंदी चित्रपटसृष्टीत १९६०-७० च्या दशकात चित्रपटांत अभिनयाची छाप सोडणार्‍या आणि केवळ अभिनयच नव्हे तर, मानधनामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. ७९ वर्षीय अभिनेत्री ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझील’ आणि ‘कारवां’ यासारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. त्यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली.

आशा पारेख यांनी १९९० साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’चे दिग्दर्शन केले होते. त्यांनी राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, अनिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. तसेच केवळ हिंदी नाही तर गुजराती, पंजाबी, कन्नड सिनेमांतूनही त्यांनी अभिनय केला आहे. आशा पारेख यांनी तसे बघितले तर अभिनयातून कधीच निवृत्ती घेतली आहे. पण ६०-७० च्या दशकातील उत्तम अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. त्यांच्या काळात मोठ्या पडद्यावर राज्य करणार्‍या आशा पारेख यांची जबरदस्त चर्चा व्हायची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!