सेवा पंधरवडानिमित्त केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे उपस्थितीत 52 जणांचे रक्तदान
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 18 सप्टेंबर रोजी सुरवात झाली. यानिमित्त खामगाव तालुक्यातील रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ना यादव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ना. यादव यांनी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण भेट देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि वृक्षरोपण केले.
यावेळी त्यांचेससह खासदार अनिल बोंडे,भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर, भाजप नेते विजयजी कोठारी, उपविभागीय अधिकारी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती .या शिबिरात 52 शेतकरी शेतमजुरांनी रक्तदान केले. काल जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात सर्वात मोठे सदर रक्तदान शिबिर ठरले. त्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन ना. यादव यांचे हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ना. यादव यांच्या हस्ते महिला बचतगटांना धनादेश व महसूल विभाग कडून देण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र व विविध योजनांचे दाखले व शिधापत्रिकाचे वितरण करण्यात आले.
रोहणा येथील कार्यक्रमात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा अंतर्गत विविध शासकीय उपक्रमांस सुरुवात करण्यात आली. यात लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण तसेच महसूल विभागाकडून देण्यात येत असलेले विविध दाखले व महिला बचत गटांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रधानमंत्री मातृवंदन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे ना. यादव यांनी उपस्थित आशा सेविकांचे सोबत चक्क त्यांचे मधोमध खाली बसून त्यांचेशी संवाद साधावा. आशा सेविकांनी ही ना यादव यांचेशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्यासोबत सेल्फी फोटो काढला. या प्रसंगाने ना यादव यांनी उपस्थितीताची मने जिकली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी खामगाव डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम उबरहंडे, डॉ. पानझाडे, डॉ. अजबे, डॉ. मगर, चंद्रकांत धुरंधर, सुरेश सोनपसारे, अनिल भोके, श्रीमती बगाडे, गजानन लोड, गिऱ्हे, बी.एस. वानखडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भाजप नेते पुरुषोत्तम ढोण, शांताराम बोधे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे , समाधान मुंडे, युवराज मोरे, सुनील वावगे, पवन वेरुळकर , उमेश ढोण आदी भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.