Pachhim Maharashtra

वडणगे येथे लम्पी आजाराबाबत लसीकरणास सुरुवात

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – वडणगे ता. करवीर येथे लम्पी आजारापासून जनावरांच्या सुरक्षिततेसाठी वडणगेत तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी बी.एच.दादा प्रेमी युवक मंचने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
समाजातील प्रत्येक घटकांसाठी येणार्‍या प्रत्येक प्रसंगावेळी ग्रामस्थांना त्या समस्येतून सावरण्यासाठी बी एच दादा प्रेमी युवक मंचचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून गावामध्ये लोकांसोबत राहून काम करणार्‍या युवक मंचच्या पाठपुराव्यामुळे नुकताच जनावरांच्या बाबतीमध्ये सुरू असलेल्या लम्पी या संसर्गजन्य रोगांपासून गावातील सर्व जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वडणगे गावात आज तातडीने लसीकरणास सुरुवात झाली. प्राथमिक टप्प्यांमध्ये गावातील सर्वच गाई, बैल, वासरांना ही लस मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व गोकुळ दुध संघ तसेच पशुवैद्यकीय दवाखाणा वडणगे यांचे सहकार्य लाभले.
वडणगेत जनावरांची संख्या जास्त असून या रोगाचा प्रादुर्भाव वेळीच थांबविण्यासाठी युवक मंचच्यावतीने जिल्हा परिषद व दुधसंघ यांना पत्रव्यवहार तसेच संबंधीत अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून गावामध्ये एकाच दिवशी सामुदाईक लसिकरणाची मोहीम हातात घेण्याची मागणी केली होती. त्याला तात्काळ यश येऊन आज प्रत्यक्षात लसीकरणाला सुरवात झाली. ही लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी मंचचे संस्थापक रविंद्र बळीराम पाटील, यांच्या समवेत डॉ. रविराज कोरे, डॉ विनायक देवणे, डॉ. मोहन पाटील, उत्तम पाटील, हर्षद पाटील, निखील शेलार, रितेश जाधव, सचिन शिंगारे, श्रीकांत नाळे, सुभाष चौगले, शुभम पाटील, अवधूत पाटील, हृदयनाथ गुरव इत्यादिंनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!