Head linesPachhim Maharashtra

श्रीरामपुरातील आदिक लॉ कॉलेजच्या तृतीयवर्ष सहाव्या सत्र निकालांत गंभीर त्रुटी

– अभाविपचे विद्यापीठ उपकेंद्र संचालकांना निवेदन

अहमदनगर (जिल्हा प्रतिनिधी) – गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय, श्रीरामपूर येथील तृतीय वर्ष सहावी विधी सत्र निकालामधे असलेल्या त्रुटी दूर करुन तसेच स्केल डाउन पद्धतीचा वापर न करता, सुधारित निकाल लावण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नगर उपकेंद्र संचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अभाविपतर्पेâ उपकेंद्रावर आंदोलनही करण्यात आले.

निवेदनात नमूद आहे, की विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या असून, सदर परीक्षेचा निकाल दि. ६/९/२०२२ रोजी विद्यापीठाकडून लावण्यात आला आहे. सदर निकाल लावत असताना स्केल डाउन पद्धतीचा वापर करण्यात अलेला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाअंतर्गत दिलेले गुण व विद्यापीठ यातून जाहीर झालेले गुण यात खूप मोठी तफावत आहे. परीक्षार्थीच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन चुकीच्या पद्धतीने करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. विद्यापीठाने कोरोना पार्श्वभूमिवर अन्याय होणार नाही, याची हमी दिलेली आहे. तरी आपण वरिल मुद्द्यांचा विचार करुन तत्काळ योग्य ती कारवाई करावी. पुढील चार दिवसात सर्व तृतीय वर्ष सहावी विधि सत्र यांचा सुधरित निकाल लवकरात लवकर लावावा. नाहीतर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. यावेळी अभाविपचे नगर जिल्हा विद्यार्थी विस्तारक चेतन पाटील, नगर जिल्हा संयोजक अर्थव पाडळे, अर्पित अंकाराम, गणेश जगदाळे,हर्षल मोटे, विशाल शिंदे, प्रथमेश कोकणे, तेजस गुमास्ते, गौरव तिपुले, प्रतिक अंकाराम, शिवराज अमृत, कुणाल चाबुकस्वार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!