Breaking newsBuldanaCrimeMaharashtraVidharbha

पोलीस कोठडीत शेगावच्या सराफावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरण : एपीआय नितीन चव्हाण सह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अकोला(ब्रेकिंग महाराष्ट्र) :- शेगाव येथील सराफा व्यावसायिकवर पोलिस कोठडीत अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी अखेर न्यायालयाने एपीआय नितीन चव्हाण सह प्रकरणातील पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर यांच्यासह अनोळखी डॉक्टर , आणि आणखीन एका विरुद्ध तब्बल विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

 

 

गेल्या सहा महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी शेगाव येथील एका सराफा व्यावसायिकास ताब्यात घेतले होते. जामिनावर सुटल्यानंतर पोलीस कोठडीत असतांना आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून पोलिसांनी आपल्याला अमानुषपणे मारहाण केली असल्याचा आरोप केला होता. पोलिस कोठडीतून जामिनावर बाहेर आल्यावर सराफा व्यावसायिक यांनी संबंधित प्रकरणाची तक्रार अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा दिली होती. परंतु सदर तक्रारीवर कुठलीही कारवाई न झाल्याचे दिसताच वकिलामार्फत कलम १५६/३ अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. सदर प्रकरणी न्यायालयाने सर्व बाबी तपासत अखेर सोमवारी याप्रकरणी एपीआय नितीन चव्हाण , पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर, चुकीचा वैद्यकीय अहवाल तयार करणारा अज्ञात डॉक्टर आणि अन्य एका अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश ७ वे प्रथम श्रेणी न्यायाधीश यांनी सिटी कोतवाली पोलिसांना दिले. सोबतच ९ जानेवारी २०२२ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या आवारातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेणे, त्याचबरोबर अपिलार्थी यांच्या निवासस्थानावरील ९ जानेवारी २०२२ या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेणे आणि प्रकरणाचा तपास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲड. आर. डी. वर्मा यांनी कामकाज बघितले.

 

या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश 

      ३७७, ३५४, ३४१, ३४३, ३४८, ३५७, ३५८, ३६२, ३६८, २९४, ३२४, ३२६, ३३०, ३३१, ४४७, ४५२, ३५२, २०१, ५०४, ५०६, ५०९, यासोबतच ३४, आणि १२०- ब या कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!