– उपनेत्यांमध्ये फक्त गोपीकिशन बाजोरिया, संजय राठोड यांची वर्णी
– मंत्रिमंडळ विस्तारात सौ. श्वेताताई महाले पाटील यांची वर्णी निश्चित!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील शिवसेनेचे नेते व उपनेते जाहीर केले असून, त्या यादीत नेत्यांमध्ये विदर्भाला झुकते माप मिळाले आहे. खासदार प्रतापराव जाधव, खासदार भावना गवळी व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी वर्णी लागली असून, पाचपैकी तीन नेतेपद विदर्भाला मिळाले आहे. तर उपनेत्यांमध्ये मात्र गोपीकिसन बाजोरिया (अकोला) व संजय राठोड (यवतमाळ) या दोघांचीच वर्णी लागली आहे.
पितृ पंधरवडा संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असून, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणे निश्चित असल्याचे भाजपच्या सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे विदर्भातील शिंदे गटाच्या आमदारांना उपनेतेपदावरच समाधान मानावे लागते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला आहे. तूर्त हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. न्यायपीठाने अद्याप काहीही निर्णय दिला नसताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या नेते-उपनेत्यांची नवी यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार भावना गवळी व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह पाच जणांना नेतेपद देण्यात आले आहे. तर तानाजी सावंत, शहाजीबापू पाटील, सदा सरवणकर, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, शरद पोंक्षे यासारख्या चर्चेतील चेहर्यांसह २६ जणांना उपनेतेपद मिळाले आहे.
——-
शिंदे गटाची नेते व उपनेतेपदाची यादी
– शिंदे गटाचे नेते –
१. श्री रामदास कदम
२. श्री. आनंदराव अडसूळ
३. श्रीमती. भावना गवळी
४. श्री. प्रतापराव जाधव
५. श्री. गुलाबराव पाटील
– शिवसेना उपनेते –
१. श्री. अनिल बाबर
२. श्री. दादाजी भुसे
३. श्री. गोपीकिसन बाजोरिया
४. श्री. श्रीरंग बारणे
५. श्री. ज्ञानराज चौगुले
६. श्री. शंभुराज देसाई
७. श्री. भरत गोगावले
८. श्री. यशवंत जाधव
९. श्री. अर्जुन खोतकर
१०. श्री. दीपक केसरकर
११. श्रीमती शीतल म्हात्रे
१२. श्री. विजय नाहटा
१३. श्री. चिमणराव पाटील
१४. श्री. हेमंत पाटील
१५. श्री. शहाजीबापू पाटील
१६. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील
१७. श्री. शरद पोंक्षे
१८. श्री. रवींद्र फाटक
१९. श्री. संजय राठोड
२०. श्री. उदय सामंत
२१. श्री. तानाजी सावंत
२२. श्री. सदा सरवणकर
२३. श्री. राहुल शेवाळे
२४. श्री. विजय शिवतारे
२५. श्री. कृपाल तुमाणे
२६. श्रीमती संध्या वाढवकर
—————–