Breaking newsDelhiPolitical NewsPolitics

महागाई, बेरोजगारीवर बोलणे सोडून भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहे – राहुल गांधी

दिल्ली(ब्रेकिंग महाराष्ट्र)- : देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा. पण आज उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता देशाला वाचवू शकतो. केवळ काँग्रेसच देशाला प्रगती पथावर आणू शकते, महागाई, बेरोजगारीची यावर बोलणे सोडून भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहेत,अशा शब्दात काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला केला.

वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवरून आज 4 सप्टेंबर रोजी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. ‘महागाई पर हल्ला बोल’ असे या रॅलीचे नाव आहे. या रॅलीवेळी झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, जो घाबरतो त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. भारतात द्वेष वाढत आहे. भारतात भीती वाढत आहे. देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. महागाई, बेरोजगारीची भीती वाढत आहे. द्वेषाने देश कमकुवत होतोय. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहेत. ते लोकांना घाबरवतात आणि द्वेष निर्माण करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी उभे राहिले तर त्याच्या विरोधात आक्रमण होते. देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. ईडी, सीबीआय सगळे पाठीमागे लागतात. माझी ५५ तास चौकशी झाली. पण मला काही फरक पडत नाही. १०० तास चौकशी करा. मात्र आज उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले.

 

भारतातील सामान्य नागरिक निराशा आणि चिंतेच्या गर्तेत अडकला आहे. पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत. दोनच उद्योगपतींना फायदा झाला आहे. तुमच्या भीतीचा आणि द्वेषाचा फायदा त्यांच्या हातात जात आहे.८ वर्षात इतर कोणालाही लाभ मिळालेला नाही. प्रसारमाध्यमे देशातील जनतेला घाबरवतात. तेल, विमानतळ, मोबाईल ही संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींच्या हातात दिले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे नाव न घेता केली.मिडियाचे काम लोकांचे प्रश्न मांडणे आहे. पण ते प्रश्न मांडत नाहीत. उद्योगपतींच्याच हातात मीडिया आहे मग ते कसे प्रश्न उपस्थित करणार? जनतेला माहित आहे, टिव्ही कुणासाठी काम करत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमावरही टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!