नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – पुराणात ऋषी पंचमीला नदीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजा अर्चना करण्यास विशेष महत्व असल्याने दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथे गुजरात, मध्यप्रदेश आणि महारष्ट्र मधील हजारो महिला भाविकांनी हजेरी लावली होती.
तापी, गोमाई आणि पूनिता नदीच्या त्रिवेणी संगमावर सकाळ पासूनच हजारोच्या संख्येने महिला भाविकांनी पुजे साठी गर्दी केली होती. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर प्रकाशातील विविध महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र होते. पोलीस दलाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या होत्या त्याच सोबत नदीपात्रात जीवन रक्षक ही तैनात करण्यात आले होते.