आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, शांतीब्रम्ह ह.भ.प. गुरुवर्य श्री.मारोती महाराज कुरेकर यांचा गुरुवारी ( दि.१ ) परम पावन अशा ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर अवतिर्नोत्सव अर्थात जन्म दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित श्रीगुरुदेवांचे अभिष्टचिंतन सोहळा धार्मिक , मंगलमय वातावरणात हरिनाम गजरात विविध सेवाभावी संस्था यांनी सत्कार केला. येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शांतीब्रम्ह ह.भ.प. गुरुवर्य श्री.मारोती महाराज कुरेकर यांचा शाल, श्रीफळ, उपरणे देऊन वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मस्तक पायावरी ! या वारकरी संतांच्या !! वचना प्रमाणे अनेक सेवाभावी संस्थानचे प्रमुख मान्यवरांनी बाबांचा सत्कार केला. अभिष्ठचिंतन सोहळ्यास गर्दी केली होती. या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर, विश्वस्त माऊली घुंडरे पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली करंजीकर, ह.भ.प. महारुद्र रेड्डे महाराज, ह.भ.प. शंकर फपाळ महाराज, हमीद शेख यांचेसह पंचक्रोशीतील वारकरी,भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply