खामगाव( ब्रेकिंग महाराष्ट्र) : शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. समाजाच्या अनेक पिढ्या या शिक्षकांच्या हाताखालून जातात. युवकाचे चांगले भविष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात. मात्र या शिक्षकी पेशाला काळीमा फासत, खामगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील 52 वर्षीय विकृत शिक्षकाची त्याच शाळेतील एका सहकारी 34 वर्षीय विवाहित शिक्षिकेवर नजर फिरली आणि शिक्षकाने प्रेमाची कविता लिहीत व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केली. या प्रकारामुळे शिक्षिकेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत, शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. या वरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक रोहिदास रामदास राठोड वय ५२, रा.खामगाव हा खामगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. पीडित ३४ वर्षीय शिक्षिका सुद्धा त्याच शाळेवर कार्यरत आहे. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यापासून रोहिदास राठोडची नजर फिरली. त्यामुळे रोहिदास राठोड हा पोरांना शिकवायच सोडून तो त्या विवाहित शिक्षिकेकडे टकटक पहात बसायचा. कोणी नसल्याची संधी साधत रोहिदास राठोड हा सहकारी शिक्षिकेसोबत वाईट उद्देशाने लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. अनेकदा शाळेत तो शिक्षिकेकडे टकटक पहायचा. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्या शिक्षकाने पीडित शिक्षिकेवर एक कविता लिहिली व ती व्हॉट्स ग्रुपवर व्हायरल केली. त्यामुळे पीडित शिक्षिकेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी राठोडविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाच्या या विकृत प्रतापामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.
गेल्या वर्षभरापासून त्याची सहकारी विवाहित शिक्षिकेवर वाईट नजर होती. वाईट हेतूने तो शिक्षिकेशी जवळीक साधायचा. गेल्या ३० नोव्हेंबर २०२१ ते ३० ऑगस्ट २०२२ दरम्यान त्याने शिक्षिकेशी वाईट वर्तणूक केली. यावर कळस म्हणजे, त्याने शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहून ती समाज माध्यमांवर तिच्या नावे प्रसारित केली. शिक्षिकेच्या तक्रारीवरून विकृत शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.