आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माेशी मधील गायत्री स्कुल मध्ये पर्यावरण पुरक गणेशमुर्ती बनविण्यास आयोजित शालेय मुलांच्या कार्यशाळेत शालेय मुले बालकांनी उपक्रमात लक्षवेधी गणेशमूर्ती बनवून कार्यशाळा यशस्वी केली.
सध्याच्या वातावरणात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढलेली आहे. कुठल्याही सणाचे उत्सवाचे वातावरण असेल त्यावेळी शालेय मुले, विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहतो. नुकताच गायत्री इंग्लिश मिडीयम व ज्युनि. काॅलेज मोशी येथे पर्यावरण पुरक गणेशमुर्ती बनविण्यासाठी आनंदी वातावरणात यशस्वी उपक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. विद्यार्थांनी गणेशाची शाडूमातीमध्ये व रंगीत क्ले मध्ये, विविध भावस्पर्शी सुंदर मुर्ती बनविल्या. या मुर्ती बनविताना त्यासाठी लागणारी हत्यारे, हाताळणे यातील बारकावे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. या उपक्रमामुळे संपुर्ण शालेय परिसरात व पालक वर्गात आनंदी वातावरण होते. मुर्ती बनविणे कार्यशाळे मुळे प्रत्यक्ष सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहताना पाहायला मिळाला. कला शिक्षक उदय ठुबे, विजय घरदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य शशिकांत जोडवे, आर गोविंद यांनी सहकार्य केले. संस्थेचे संस्थापक विनायक भोंगाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी व आयोजक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, कार्यकारी संचालक काजल छतिजा, आदी उपस्थित होते. हा आनंद देणारा उपक्रम आनंदात साजरा झाला.