Breaking newsBuldanaMaharashtraVidharbha

देऊळगाव घुबे येथे शेतकरी संघटनेचा शनिवारी भव्य जिल्हा मेळावा

– प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख करणार शेतकर्‍यांना मार्गदर्शन

चिखली (एकनाथ माळेकर) – शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकर्‍यांच्या जीवनात आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने अमुलाग्र बदल करणारे शेतकर्‍यांचे पंचप्राण स्व. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी (दि.३) भव्य जिल्हा मेळावा देऊळगाव घुबे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख हे शेतकर्‍यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी सभापती भानुदास घुबे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुळेअण्णा सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक रमेशअण्णा मुळे हे राहणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर, स्व. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वडले, विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे वाशिमचे अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव घाडगे, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील कणखर, शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील कणखर, दामोधर शर्मा, स्वातंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशसिंह चव्हाण, एकनाथ पाटील थुट्टे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. वामनराव जाधव, नामदेवराव जाधव, शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रणजीत डोसे, महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई खांडेभराड, माजी जिल्हाध्यक्ष बाबुराव नरोटे, युवा आघाडीचे माजी अध्यक्ष डॉ. विनायक वाघ, माजी पंचायत समिती सदस्या सौ. उषाताई थुट्टे, स्वातंत्र भारत पक्षाचे माजी अध्यक्ष शिवप्रसाद सारडा, शेतकरी संघटनेचे शेगाव तालुका प्रमुख डिगांबर चिंचोले, देऊळगावराजा तालुका प्रमुख तेजराव मुढे, तसेच प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’, मुंबईचे मुख्य संपादक व साधना न्यूज टीव्ही, नवी दिल्लीचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे हेदेखील या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असे शेतकरी नेते भानुदास घुबे यांनी सांगितले आहे.


या मेळाव्यानिमित्त सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मिरवणूक व कला पथकाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेनंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन आहे. शेतकरी संघटना, देऊळगाव घुबेच्यावतीने आयोजित या शेतकरी मेळाव्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उपस्थित राहून प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही भानुदास घुबे यांनी केले आहे.

– कार्यक्रम पत्रिका- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!