सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; भाजपचे आमदार अतुल भातखळांविरोधात गुन्हा दाखल
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा तथा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता, त्यांना कोरोना झाल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणात अतुल भातखळकर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, हा कोरोनाचा ईडी व्हेरिएंट असल्याच म्हटले होते. त्यांच्या या ट्वीटवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी काँग्रेसचे नेते संदीप उदमले यांनी पुण्यात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आ. भातखळर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीच्या मार्फत चौकशी सुरू होती. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल ट्वीट केले आहे. चौकशी सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी या गैरहजेर राहिल्या होत्या. त्यावर अतुल भातखळकर यांनी ‘ईडी व्हेरियंटट असं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर काँग्रेस तीव्र संताप व्यक्त केला.