Aalandi

हुतात्मा राजगुरू जयंती आळंदीत साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुक्याचे सुपुत्र क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या ११४ व्या जयंती निमित्त आळंदी येथील श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयात शालेय मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक नागरिकांचे वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्याध्यापक तात्यासाहेब गावडे यांचे हस्ते क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक अतुल पवार, जेष्ठ शिक्षिका जे.एस.वाघमारे, के.एन.देवकर, शिक्षकेतर कर्मचारी पोपट घाडगे, डी.एस. धुमाळे, व्हि.एन. भालेराव, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींचे हस्ते पुष्पांजली अर्पण करीत उपस्थितांनी अभिवादन केले.
या प्रसंगी क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या जीवन कार्याची माहिती शालेय मुलांना देण्यात आली. क्रांतिकारकांच्या जयघोषाच्या घोषणा देत मुलां मध्ये देशाभिमान जागृत करण्यात आला. वंदेमातरम गीताने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त आयोजीत अभिवादन सभेची सांगता करण्यात आली.

आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस, आळंदी जनहित फाउंडेशन, स्वकुळ साळी ज्ञातीगृह, एल्गार सेना, यशवंत संघर्ष सेना आदी सेवाभावी संस्थेसह नागरिकांचे वतीने क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जयंती दिनी प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वकुळ साळी ज्ञातीगृह संस्थेचे खजिनदार मनोहरशेठ दिवाणे, यशवंत संघर्ष सेना राज्य उपाध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेने आळंदी शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे,आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य भागवत काटकर यांनी हुतात्मा राजगुरू यांचेसह क्रांतीकारकांच्या जीवन कार्यातुन प्रेरणा घेऊन कार्यरत राहण्याचे युवक तरुणांना आवाहन केले. यावेळी क्रांतिकारकांच्या देशप्रेम आणि जीवन चरित्राची माहिती दिली. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!