– चिखली तालुक्यात जनतेमधून थेट ९९ सरपंच निवडून येणार!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३३ (१) ३३ (२) नुसार सन २०२० ते २०२५ या कालावधीत मुदत संपणार्या चिखली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षित जागेवर जनतेमधून ९९ ग्रामपंचायतींपैकी ५३ ग्रामपंचायतींमध्ये महिला निवडणूक लढविणार आहेत. तसेच, निवडून येणार्या महिलेच्या हाती सरपंच म्हणून गावाचा कारभार येणार असल्याचे ५३ गावांत या आरक्षणाच्या निमित्ताने महिला याच गावकारभारी होणार आहेत. त्यामुळे अनेक गावांत सरपंचपदाची निवडणूक लढविणार्या इच्छुक पुढार्यांमध्ये कभी खुशी कभी गम असे चित्र चेहर्यावर पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागामध्ये मिनिमंत्रालय समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हटले की, गावातील हवसे, नवसे, गवसे दंड थोपाटून निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार राहतात. आणि घराघरामध्ये अटीतटीचा संघर्ष करीत एकमेकाविरोधात निवडून येतात आणि निवडणुका आटोपल्यानंतर सुध्दा एकमेकातील वाद दिवसेंदिवस चालू राहतात. अशा या तालुक्यातील सन २०२० ते २०२५ कालावधी मध्ये मुदत संपणार्या ग्रा. प. च्या निवडणूकिसाठी सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार अजितकुमार येळे यांच्या मार्गदर्शना खाली ४ मार्च २०२१ मध्ये तहसील कार्यालयात काढण्यात आले होते. त्यामध्ये सर्वसाधारण महिला २४ , अनु जाती महिला १० , अनु जमाती ४ ,ना मा प्र महिला १५ अशा एकूण ९९ ग्रा.प.पैकी ५३ ग्रा.प.च्या निवडणूका सन २०२३ मध्ये जनतेमधून घेतल्या जाणार आहेत. काही महिन्यावर निवडणुका आल्याने गावा गावात आतापासूनच पुढारी हे ग्रां.प. च्या निवडणुकीसाठी तयारी दाखवीत एकमेकांना भेटी घेणे , दारू , चहा पाणी , करणे , एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे , कामे करुण देण्याचे आश्वासन देणे , असे विविध आश्वासने दिल्या जात आहेत. मात्र गावामध्ये ज्या व्यक्तीने जास्त विकास केला, अशा व्यक्तीला मतदार यापुढेही निवडून देणार आहे तर काही मतदार पैसावाले उमेदवार पाहत आहे. त्यामुळे आता सरपंच पदासाठी कोण भारी ठरणार हे येणार्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
सरपंचपद महिलांसाठी आरक्षित ठरलेली गावे अशी – ना.मा.प्र महिला राखीव साठी देवठाणा , भोगावती, बेराळा, एकलारा, कोलारा ,येवता, वळती, खैरव, मंगरूळ (ई), शेळगाव आटोळ, शिंदी हराळी, डोंगर शेवली , गुंजाळा , कोनंड, मेरा बु. अनु जातीसाठी महिला राखीव आंधई , हरणी , महीमळ , करवंड, अमडापूर , भानखेड , पिपरखेड , किन्ही नाईक , तोरणवाडा. अनु. जमाती महिला राखीव साकेगाव, किन्ही सवडत , वैरागड. सर्वसाधारण महिला राखीव करिता सावंगी गवळी , मनुबाई , मोहदरी , भोरसा भोरसी , भोकर , भालगाव , सातगाव भुसारी , काटोडा , मुंगसरी , अंत्री खेडेकर , खोर , टाकरखेड मु. , सोमठाणा , उत्रादा , दहीगाव ,नायगाव बु , खंडाळा मकरध्वज , करतवाडी , सावरगाव डुकरे , भरोसा , मुरादपूर , हातणी , केळवद , पळसखेड , दौलत अशा एकूण ५३ ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच पदासाठी जनतेमधून निवडणुका लढविणार आहेत. त्यामुळे मात्र पुरुष नेते मंडळीं मध्ये कभी खुशी कभी गम असे चित्र पाहायला मिळत आहेत.