Aalandi

आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिरांत भाविकांची गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारी आळंदी पंचक्रोशीतील विविध शिवमंदिरांत भाविकांची श्रींचे दर्शनास गर्दी झाली होती. मंदिर परिसरांत रांगा लावून भाविकांनी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले.  परंपरेने मंदिरात शिवअभिषेक पूजा, दर्शन,महानैवेद्य, बेलपान वाहत भाविकांनी श्रींची पूजा केली.  आळंदीतील श्री सिद्धेश्वर, श्री वैतागेश्वर, वडगाव घेनंद येथील पुरातन पांडव कालीन श्री महादेव , धानोरे येथील धनेश्वर, चाकण येथील चक्रेश्वर मंदिर, मोशी येथील श्री नागेश्वर महाराज आदी परिसरातील शिव मंदिरांत भाविकांनी दर्शनास गर्दी करून रांगेत दर्शन घेतले.

येथील चऱ्होली बुद्रुक मध्ये ही श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिव दर्शनास भाविकांची गर्दी झाली होती.  भाविकांनी मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीनां अभिषेख केला.  भाविकांना मंदिरात देवस्थान तर्फे केळी, तसेच उपवासाच्या फराळाचे वाटप प्रसादात करण्यात आले. मंदिरावर श्वान निमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर सुशोभित करण्यात आल्याने मंदिर परिसर पर्यटन केंद्र ठरला आहे. यावेळी शिव मंदिरातील शिव पिंडीवर अनेक भाविकांनी बेलपत्र, तीळ व शुभ्र पुष्प वाहिली. तर काही भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला. भाविकांचे शिव दर्शन झाल्यानंतर मंदिरात देवस्थान तर्फे केळी व इतर उपवासाचा महाप्रसाद देण्यात आला. श्रावण महिन्यात चऱ्होलीसह परिसरातील मोठ्या संख्येने भाविक परिवारासह शिव मंदिरांत दर्शनासाठी येतात. च-होली श्री वाघेश्वर मंदिर मुख्य प्रवेशद्वार जवळ मंदिराच्या माहितीचा दर्शनी फलक लावण्यात आला आहे. च-होलीतील श्री वाघेश्वर मंदिर महानस्थळ ओळखले जाते. दाभाडे कुटुंबातील मूळ पुरुष बज पाटील याचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे यांनी श्री वाघेश्वर मंदिर बांधले असून ते इ.स. १७२५ ला येथील मंदिर टेकडीवर विकसित केले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार चऱ्होली बुद्रुक मधील ग्रामस्थानी सुरु केला. यास पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने विशेष सहकार्य केले आहे.

येथील मंदिरात शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज येत असत. प्रत्येक श्रावण सोमवारी दर्शनास भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. येथील उद्योजक राघुशेठ पठारे यांचे वतीने भाविकांना फराळ केळी वाटप करण्यात आले. आचारी कैलास सरोदे याचें वतीने शाबुदाणा वडे व चटणी चे महाप्रसाद वाटप झाले. जालिंदर जोरे याचेंकडून पंचमुखी रुद्राक्ष भाविकांना मोफत वाटप करण्यात आले. जाग्रृत देव श्री वाघेश्वर स्वकाम सेवा मडंळ (रजिस्टर)च्या माध्यमातून देखभाल, जिर्णोद्धार, मंदिर परिसरात बाग बगीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर नितीनआप्पा काळजे, सहकारी नगरसेवक यांच्या प्रयत्नातून लक्षवेधी विकसित करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष संचालक प्रविणशेठ काळजे यांनी दिली,

श्री वाघेश्वर महाराज देवस्थान मध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्त काळूराम पठारे, कृष्णकांत तापकीर, ॲड. जालिंदर जोरे, वैष्णवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर यांच्याकडून श्री चरणी पितळी मुखवटा अर्पण करण्यात आला आहे.  ॲड जालिंदर जोरे यांच्या वतीने ११ हजार १११ पंचमुखी रूद्राक्ष वाटप महंत श्री श्री श्री लक्ष्मणनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. मामा सरोदे आणि राघु पठारे यांच्या वतीने प्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!