BuldanaChikhaliVidharbha

विश्वकर्मा सुतार समाजाच्यावतीने रविवारी बुलडाण्यात गुणगौरव सोहळा

– गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, पत्रकार व गुणवंत कामगारांचा होणार गौरव

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज एकीकरण समिती व जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज यांच्यावतीने रविवारी (दि.२१) बुलडाणा येथील वसंत प्लाझा कॉम्लेक्स, चिखलीरोड येथे इयत्ता दहावी, बारावी तथा पदवी-पदविका प्राप्त गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह पत्रकार व गुणवंत कामगार यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. विजय खोलाडे यांनी दिली आहे.

विश्वकर्मा सुतार समाजाच्यावतीने दरवर्षी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स, वृंदावननगर स्टॉपजवळ, हाजी मलंगबाबा दर्गाजवळ, चिखलीरोड बुलडाणा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आ. डॉ. रायमुलकर, आ. संजय गायकवाड यांच्यासह प्रसिद्ध व्याख्याते व लेखक डॉ. संतोष बाहेकर यांचे समाजबांधवांना मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, या गुणगौरव सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज एकीकरण समिती तथा विश्वकर्मा सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय खोलाडे, उपाध्यक्ष मंगेश जवंजाळकर, सचिव गजानन बोराडे आदींसह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.

– कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!