BuldanaMaharashtra

लोक अदालतीमध्ये ६,२६७ प्रकरणांचा निपटारा; २६ कोटींचा दंड वसूल!

बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बुलडाणा जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १३ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६,२६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून तडजोडीअंती तडजोड शुल्क व दंड म्हणून २५ कोटी ९८ लक्ष ६० हजार १०८ रुपये वसूल करण्यात आले. तर घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या पतीपत्नीचा संसार जुळल्याने ते दोघे एकत्र नांदण्याकरीता गेले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतमध्ये बँक, ग्रामपंचायत, बीएसएनएल (दुरध्वनी) कार्यालय, नगर परिषद बुलडाणा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांचे ३१ हजार ९४४ दाखल झाले होते. त्यापैकी ५ हजार ६१२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ४ कोटी २४ लक्ष ३२ हजार ८६१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. तर न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे ६ हजार ९१२ प्रकरणे ठेवण्यात आले असून त्यापैकी ६५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकूण रूपये २१ कोटी ७४ लक्ष २७ हजार २४७ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. जिल्ह्यात ३८ हजार ८५६ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी एकूण ६२६७ प्रकरणे निकाली काढण्यात आलीत व त्यातून २५ कोटी ९८ लक्ष ६० हजार १०८ रुपये तडजोड शुल्क दंड म्हणून वसूल करण्यात आला. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे विधीज्ज्ञ, बँकांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा यांचे कर्मचारी, आर.आर.चाकोतकर, अधिक्षक एस.डी.वा’, व्ही.डी. बोरेकर, वरिष्ठ लिपीक, एस. एस. महाजन, एस.एन.मुळे, कनिष्ठ लिपिक जी.पी.मानमोड ए.बी. अवचार, लहाने, मिलके, विशाल भवटे, प्रविण खर्चे, समाजसेवक तसेच बुलडाणा न्यायालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

11 पॅनलने पाहिले काम..

स्वप्नील.चं.खटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एन.मेहरे, जिल्हा न्यायाधीश १, बुलडाणा, पी.ए.साने तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१,श्रीमता एच.एस.भोसले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर बुलडाणा. ए.यु.सुपेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, डी.पी.काळे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती एन.एस.जमादार, २ रे दिवाणी न्यायीधीश क-स्तर, एम. ए.पठाण, ३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि डब्ल्यू. डी.जाधव, ४ थे सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर, अ.गो.मगरे, न्यायाधीश कामगार न्यायालय बुलडाणा आणि व्ही.डी.ढवळे, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग, हेमंत.एस.भुरे, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा असे एकूण ११ पॅनल तयार करण्यात आले होते. सदर पॅनलवर अ‍ॅड.अमर इंगळे, सचिव, जिल्हा वकीलसंघ बुलडाणा, अ‍ॅड. आर.ई.निकम, श्रीमती जे.एस.चव्हाण, आर.बी.तायडे, ए. जी.देशमुख, ए.व्ही.देशमुख, श्रीमती सी. एम. बावणे, श्रीमती के.पी. राठोड, आर.एन.मोरे, एम.एल.मगर यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले तर अ‍ॅड.सुबोध तायडे यांनी चौकशी पॅनलचे काम पाहीले.


‘त्या’ दोघांचा लोकन्यायालयात संसार जुळला..
ए.यु.सुपेकर दुसरेसह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर बुलडाणा यांच्या पॅनलसमोर पतीपत्नीने संमतीने घटस्फोटाकरीता केलेल्या अर्जामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा स्वप्नील चं.खटी त्याप्रमाणे अर्जदाराचे विधीज्ज्ञ सौ.शर्वरी सावजी व बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार सावळे यांच्या सहकार्य व योगदानामुळे संसार जुळला व ते दोघेही एकत्रीत नांदण्याकरीता गेले.

जिल्हा न्यायालय बुलडाणा, कौटूंबीक न्यायालय बुलडाणा, कामगार न्यायालय बुलडाणा व ग्राहक मंच बुलडाणा यांच्याकडील प्रलंबीत प्रकरण ७९६ पैकी ९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच दाखलपूर्व प्रकरण २०९४ पैकी ३४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ११ कोटी ३६ लक्ष १० हजार ४२० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!