नंदूरबार (आफताब खान) – देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा गाजावाजा केला जात आहे. मात्र ज्या स्वातंत्र्यवीरानीं देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढा दिला होता. आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्या स्वातंत्र्यवीर शहिदांसाठी तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दुरवस्था होत आहे. शहादा शहरातील हुतात्मा स्मारक हे दुर्लक्षित आणि अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडले आहे.
साधरणतः पन्नास वर्षापुर्वी शहरातील गांधी पुतळ्याजवळ बांधलेल्या या हुतात्मा स्मारका भोवती फेरीवाल्यांसह विक्रेत्यांचा गराडा दिसुन येतो. तर सुशोभिकरणा अभावी शहादा येथील हुतात्मा स्मारकाची दुरावस्था झाली आहे. देशात स्वातंत्र्याच्या ७५वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र ज्यांनी लढा दिला त्यांच्या नाव मिटत चालला आहे. त्यामुळे सरकार अमृत महोत्सवाच्या नावाने जय्यत तयारी करत आहे. मात्र जे खरे शूरवीरानीं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे नाव बघण्याला प्रशासनाला वेळ नसल्याने स्वतंत्र महोत्सव साजरा करून काय उपयोगाचे ? असा प्रश्न आता केला जात आहे. या स्मारकावर शहादा तालुक्यातील १९ शहीदांचा नावे देखील कोरण्यात आलेली आहेत.
यशवंत चौधरी- अध्यक्ष शहादा नागरी समिती