आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वारकरी संप्रदायातील शिक्षण पूर्ण करून सेवारत कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या माध्यामातून ज्ञानाई मधुकरी वाटप सेवा सिध्दबेट केळगाव येथे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक जेष्ठ कीर्तनकार प. पु. गुरुवर्य डाॅ. माणिक बाबा शास्त्री यांच्या हस्ते श्रींची पूजा करून हरिनाम गजरात सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी माजी विरोधी पक्ष गटनेते नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर, हमीद शेख. प्रल्हाद भालेकर, दिपक महाराज पैठणे, वटांबे महाराज. भक्त फड महाराज, संयोजक रामेश्ववर महाराज मायकर, गणेशशेठ आबेकर, राहूलशेठ भोर, गोवर्धन भोसले, महाजन महाराज, धर्मे महाराज, सुरेश महाराज चोपदार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मिराताई भोसले, पानसरे ताई. जनाबाई पानगव्हाणे, हेंमा ताई नागरगोजे आदींसह वारकरी साधक उपस्थित होते.
आळंदीत शालेय शिक्षणा समवेत वारकरी शिक्षण घेन्यासराज्यातून आळंदीत मोठ्या प्रमाणात बाल वारकरी विद्यार्थी आलेले आहेत. यमुलांच्या जेवणाची एक वेळ सौ या माधुकरी वाटप सेवेतून होत आहे. या अन्नदान माधुकरी वाटपाचा प्रारंभ शास्त्री महाराज यांचे हस्ते श्रींची विधिवत पूजा, आरती करून हरिनाम गजरात करण्यात आला. या उपक्रमास वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक संस्थेचे माजी अध्यक्ष मारुतीबुवा महाराज कुरेकर यांचे कृपाशिर्वाद लाभले असून आळंदीतील अन्नदानाचे परंपरा पुढे नेण्याचा या ज्ञानाई मधुकरी अन्नछत्रातून होत आहे. यावेळी शास्त्री महाराज,गजानन महाराज लाहुडकर आदींनी मार्गदशन केले. यावेळी ज्ञानाई मधुकरी सेवा उदघाटनास इंजिनीयर सुग्रीव मायकर उपस्थित होते.
जास्तीत जास्त वारकरी साधकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर महाराज मेकर यांनी केले आहे. या उपक्रमास समाजातील दानशूर व्यक्ती संस्थानी सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी केले आहे.