– रोही (निलगाय) जनावरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांची नासाडी
मेरा बु , ता. चिखली (प्रताप मोरे) : चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मेरा बुद्रूक महसूल मंडळामध्ये असलेल्या गावाच्या शिवारात दरवर्षी पेक्षा यावर्षी रोही जनावरांच्या कळपाने मोठ्या प्रमाणावर हैदोस घालून पिकाची नासाडी चालविली असल्याने खरीप हंगामातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे सरकारने रोही जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा येणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा संताप शेतकरीवर्गामध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचा सूचक इशाराही या गावांतील शेतकर्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींना दिला आहे.
मेरा बु महसूल मंडळ विभागातील १६ गावाचा कारभार तहसीलदार अजितकुमार येळे हे पाहत आहेत. त्यामध्ये शेतधुर्याचे वाद , शेत रस्ते , आदी जमिनीचे प्रकरणे , वादविवाद , आदी प्रकरणे ते दररोज हाताळत आहेत. या मंडळ विभागात असलेल्या गुंजाळा , मनुबाई , मेरा बु , अंत्री खेडेकर , असोला , रोहडा , गांगलगाव , चंदनपूर , रानअंत्री , अंबाशी , खैरव , कोलारा , भालगाव , मुरादपूर , असे एकूण १६ गावे या मंडळामध्ये समाविष्ट असून, या गावाच्या आजूबाजूला सरकारी ईक्लास, सीक्लास जमिनीचे क्षेत्रफळ जास्त असल्याने रोही जनावरांचा हल्ली मुक्काम या सरकारी डोगराळ भागात असतो. तसेच या गावाच्या शिवारातील जमीन डोगराळ असलेल्याने खडकाळ स्वरूपाची आहे .त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग दरवर्षी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. एकीकडे यावर्षी पावसाने गेल्या काही दिवसांपासून संततधार हजेरी लावल्याने ओल्या दुष्काळाचे चित्र निर्माण होवून पिके चिभडल्याने पिवळे पडली आहेत.
सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकामध्ये कोळपणी , खुरपणी , औषधी फवारणी , खत टाकणे आदी शेतकर्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत आणि दुसरीकडे शेकडो रोही जनावरांचा कळप पिकामध्ये हौदास घालून पिके कतरडून टाकतात ,नासधूस करतात. रोही जनावरांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी दिवस रात्र शेतात मुक्काम ठोकतो. परंतू रोही जनावरांची संख्या इतकी वाढली आहे की , एकीकडे रोही शेतातून हाकलून लावले जातात आणि दुसर्या बाजूने रोहीचा कळप शेतात घुसून पिकाचे नुकसान करुण टाकतो. मागील वर्षी अनेक शेतकर्यांनी रोही जनावरांनी केलेल्या पिकाचे नुकसान बाबतीत संबंधित प्रशासन विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रारी नोंदविल्या. मात्र वन विभागाचे कर्मचारी आपली मनमानी करुण ऑनलाइन तक्रार द्या ऑफलाईन चालत नाही असे म्हणून बाहेरचा रस्ता दाखवितात, तर काही शेतकर्यांनी ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन तक्रार नोंदविल्या मात्र शेतकर्यांना तुटपुंजी रक्कम देवून समाधान केले होते. यावर्षी तर एकीकडे संततधार पाऊस व दुसरीकडे रोही जनारांचा धुमाकूळ, अशा या परिस्थितीमुळे खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून जाण्याचा मार्गवर येवुन ठेपला आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांकडून पीक विमा भरणा नावाखाली पैसे गोळा न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, तसेच रोही जनावरांनचा वेळीच बंदोबस्त न केल्यास येणार्या निवडणुकीवर शेतकरी बहिष्कार टाकतील, असा आक्रोश शेतकरी राजेंद्र पडघान , विजू पाटील , जगू नाना , भारत पवार , श्रीधर सुरुषे , दीपक सुरुशे, बबन कुमठे , बाबूलाल जोहरे , पंजाब खेडेकर , नामदेव झिगाजी मोरे , पी टी मोरे , प्रताप मोरे , सिध्दांर्थ गवई , बबन मोरे , विजयानंद मोरे , नारायण मोरे , सागर मोरे , प्रदीप मोरे ,केशव केदार , बबन केदार , सिताराम केदार , गजानन वानखेडे , गणेश केदार , सुनिल केदार , ज्ञानेश्वर पवार , श्यामराव शिंदे , गजानन केदार , विठ्ठल केदार , समाधान मोरे , अशोक थोरवे , अनिल मोरे , किसन मोरे , माणिक गवई , आदी शेतकर्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
Leave a Reply