श्री शिवाजी महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
चिखली/मेरा बु. (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन प्रवेश घेतलेल्या वर्ग ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण व त्यांना फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना महाविद्यालयातील सर्व विभागाची प्रत्यक्ष त्या विभागात नेऊन ओळख करून देण्यात आली. शिवाय, बारावी व जेईई परीक्षांतील टॉपरचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख हे महाविद्यालयात सातत्याने कल्पक उपक्रम राबवित असतात. त्यामुळे या महाविद्यालयाची वेगळी छाप पडली असून, डॉ. देशमुख हे तालुक्यातील सर्वात विद्यार्थिप्रिय प्राचार्य ठरले आहेत. ११ वी व बारावीच प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे महाविद्यालयात औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच त्या त्या विभागातील जसे की, एमसीव्हीसी विभाग संजय चिंचोले, वाणिज्य विभाग शशिकांत पाटील, संगणक आर पी गेडाम, परमाणुशास्त्र पी. जी. सवडतकर, रसायनशास्त्र विभाग प्रतिभा चिखले, जीवशास्त्र विभाग प्रियंका चव्हाण, सूक्ष्मजीवशास्त्र पुनम वैद्य व राजू करपे, प्राणीशास्त्र विभाग प्रियंका चव्हाण, ग्रंथालय भगत, एनसीसी लेफ्ट.किरण पडघान, इंग्रजी विभाग आर के पवार, मुक्त विद्यापीठ वैभव शेळके, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एस व्ही काळे, पदार्थविज्ञान विभाग दीपक मावळे, क्रीडा विभाग सचिन कोकोडे, एनएसएस एस.बी.जाधव, पासेस व इतर सुविधा अमोल मुगल यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून विभागांची सविस्तपणे माहिती दिली.
वर्ग बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय सायली गोंधणे, आदित्य सोनवणे, शुभम जाधव, कडूबा भालेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जेईई मेनमध्ये ९९.६५ टक्के गुण घेऊन प्रथम आलेले सोहम अंभोरे, ९१.१३ टक्के गुण घेऊन सुशील बारड हा द्वितीय आहे तर ८७ टक्के आदित्य सोनवणे, ८६ टक्के अभिजीत पडघान या गुणवंतांचे यावेळी सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लेफ्ट.किरण पडघान यांनी केले तर मार्गदर्शन डी. आर. उन्हाळे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणात विविध सुविधा व स्कॉलरशिपबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन दिव्या दिघेकर व चंचल धनवे यांनी केले, तर पुनम करवा यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.