– सामाजिक कार्यकर्त्याला ऑटिड रिपोर्ट देण्यास नकार का?
बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव ग्रामपंचायमधील ऑडिट रिपोर्टची फाईल गायब झाली की काय? असा प्रश्न गावकर्यांमध्ये पडला आहे. कारण ग्रामपंचायतच्या कारभाराची ग्रामसेवकानी पंचायत समितीला ऑडिट रिपोर्टची माहिती दिली नसल्याची चर्चा संपूर्ण गावात पसरली आहे. त्यामुळे हिंगणा कारेगाव ग्रामपंचायत ऑडीट रिपार्ट गुलदस्तातच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विशेष म्हणजे, एका सामाजिक कार्यकर्त्याने हा ऑडिट रिपोर्ट मागितला असता, तो दिला गेला नाही. त्यामुळे एकूणच संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
संविधानिक कायद्यानुसार, ग्रामपंचायतची माहिती ग्रामसभेत नागरिकांना देणे गरजेचे असते. मात्र ही ग्रामसभा होत नसल्याची किंबहुना केवळ कागदोपत्रीच दाखविल्या जात असल्याची ओरड आहे. गावातील प्रमोद जाधव यांनी माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायतची ऑडीट रिपोर्टची फाईल मागितली आहे. परंतु अद्याप सदरची माहिती त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचे गजब नमुने समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी शासनाकडून लेखापरीक्षण केले जाते. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या कारभार्यांकड़न आवश्यक ती कार्यवाही करून दप्तर तपासणीसाठी देण्यात येते. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या लेखापरीक्षणामधून समोर येतात. त्यामध्ये दुरुस्ती करून पन्हा सधारणा करता येते. मात्र हिंगणा कारेगाव ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण झाल्यावर त्याचे अहवाल दोन ते तीन वर्षे मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील हिंगणा कारेगाव ग्रामपंचायतीच्या कारभारात काही गैरव्यवहार झाला असल्यास तो लवकर बाहेर येत नसून, त्रुटी दर करण्यासही विलंब होत आहे. त्याचा विकासकामांवरही परिणाम होत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या नियमानुसारच खर्च केला आहे का? त्याची कागदोपत्री टिप्पणी जळते आहे का? त्यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का? याची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केले जाते. परंतु हिंगणा ग्रामपंचायमध्ये अशी कुठलीही तपासणी करण्यात येत नसल्याचा आरोप होत असून, नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. संदर्भात हिंगणा कारेगाव येथील प्रमोद जाधव यांनी माहितीचा अधिकाराखाली माहिती मागितली असता, ते ऑडीट रिपोर्ट देण्यास ग्रामसेवक नकार देत असल्याने कुछ तो गडबड है? असा सवाल नागरिकांमध्ये पडला आहे. हिंगणा कारेगाव ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाला असेल, तर तो बाहेरही येत नाही. त्यामुळे संबंधितांचे साधत असल्याची चर्चा गावभर सुरु आहे. याकडे गट विकास अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.