Breaking newsBuldanaVidharbha

डेअरी व कृषी उत्पादनांवरील जीएसटी रद्द करा

खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र): वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत लोटण्याचा निर्णय घेण्यात आला असून १८ जुलैपासून आता अनेक दैनंदिन वस्तूसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत .आजवर करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावरदेखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे महागाईत वाढ होणार असल्याने अवाजवी दरवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात जीएसटी काऊन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू व सेवांवरील जीएसटीचे दर वाढ जाहीर केली आहे. या बैठकीत स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर पाच टक्के दर वाढ होणार आहे सरकारने आणलेली ही दरवाढ आणि त्यात समाविष्ट केलेल्या वस्तू यामुळे गोरगरिबांना अधिकच हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. सीएनजी आणि पीएनजी यांची झालेली दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावी, जगामध्ये सर्वात जास्त गॅस सिलिंडरचे भाव भारतामध्ये वाढलेले आहेत. गृहिणींचा बजेट कोलमडत आहे तरी त्वरित गॅस सिलिंडरचे भाव कमी करण्यात यावे व केलेली दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, संघपाल जाधव, नितीन सूर्यवंशी, बाळू मोरे, दादाराव हेलोडे, रमेश गवारगुरु, चंद्रकांत टेरे, संजय दाभाडे, जे.के. रणीत यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!