नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – गुजरात राज्यातील सुरतहून नंदुरबारकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास टायर फुटल्याने अपघात झाला. कार अनियंत्रित झाल्याने कठडे नसलेल्या पुलाचे लोखंडी खांब तोडून कार थेट नदी जवळ कोसळली. या अपघातात दोन महिला, तीन पुरुष, सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. त्यांना विसरवाडी पोलीसांनी अपघातग्रस्तांना कार मधून बाहेर काढून उपचारासाठी एप्पेरिक्षा मध्ये टाकून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सर्वाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अपघात झाला. टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली. अपघात एवढा भीषण होता की पुलावरील दोन-तीन लोखंडी राॅड तोडून कार खाली कोसळली. अपघात होताच पोलीस व स्थानिकांनी नागरिकांनी दरवाजा उघडून जखमींना बाहेर काढले व रुग्णालयात नेले. कार मध्ये एकूण सहा प्रवासी होते. रमेश पाटील, कल्पेश देवरे, अश्विनी देवरे,अशोक पाटील, निलिमा पाटील व त्यांचा सहा महिन्यांचा बालकांचा समावेश आहे. सर्व राहणार नंदुरबार जगताप वाडी येथील आहे. या अपघातात सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात कारचा देखील मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास विसरवाडी पोलिस करीत आहे.