नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – श्रावण महिन्यातील पहिला शनिवार व रविवारी खान्देशची आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. कानुबाईचे रोट खाल्यानंतर कानुबाईचे आज विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शनिवारी कानबाईंच्या मुखवट्यांचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर रविवारी विधीवत पुजनाने त्यांच्या स्थापना करण्यात आले होते. आज त्यांचे विसर्जन झाले असून, यासाठी ज्या घरात कानुबाई स्थापन झाल्या आहेत. त्या घरातील अबाल वृद्ध तल्लीन होवुन पारंपारीक ठेका धरतांना दिसुन आले. फुगड्यांसह महिलांनी नृत्यावर धरलेला ठेका कानबाईच्या उत्सव द्विगुणीत करतांना ठरत आहे. खानदेशवासीयांचा महत्त्वपूर्ण सण कानबाईच्या उत्सवासाठी सर्वच कुटुंबीय एकत्र येत असतात नंदुरबार जिल्ह्यातही भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.