मेरा बु. ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – अमोना येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने बुद्ध विहार परिसरामध्ये वृक्ष लागवड केली व सामाजिक उपक्रमाने वर्षावास साजरा केला.
अमोना येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुध्दा आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीसाठी वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन बौध्द समाज बांधवांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला समाज बांधवांनी पूर्ण गावातून श्रामनेर संघ व गावातील तसेच बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांनी पांढरे कपडे परिधान करून शांततेत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. गावातून रॅली काढत असतांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हारार्पण करण्यात आले आणि बुद्ध विहारजवळ येवून बुद्ध वंदना, त्रिशरण पाठ घेवून पंचशील ध्वज फडकविला.
या वर्षावास कार्यक्रमामध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ बुध्द विहारामध्ये पू. भन्ते यांच्याकडून बुध्द आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात येत आहे वर्षावास कार्यक्रमात दररोज महिला, पुरुष तथा लहानांपासून तर वयोवृध्दापर्यंत उपासक, उपासिका उपस्थित राहतात. बुध्द विहारामध्ये बसलेल्या भिक्षुना प्रत्येक कुंटुंबाकडून भोजनदान दिल्या जाते. ही प्रथा यापुढे जोपासण्याची गरज आजच्या तरूण पिढीला महत्वाची आहे. यावेळी अमोना येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे सदस्य दादाराव आसाराम वानखेडे तथा पदाधिकार्यांनी ४० वृक्षाचे वृक्षारोपण केले. तसेच गावातील सचिन वानखेडे, सिद्धेश्वर वानखेडे, रावसाहेब मघाडे, अनिल वानखेडे , सदानंद वानखेडे, संदीप मघाडे, भगवान वाघ, अंकुश वाघ, कैलास गावडे आदी उपासक, उपासिका उपस्थित होते.
वर्षावास कार्यक्रमानिमित्त अमोना येथे वृक्ष लागवड