मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- एसटी बस बिबीवरून चिखलीकडे जात असतांना मेरा खुर्द फाट्यावर बसमधून प्रवासी खाली उतरत होते. तेवढ्यात पाठीमागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिली. मात्र पाठीमागून गाडी धडकल्याने प्रवाशांचे जीव बालंबाल बचावले. घटना मेरा खुर्द फाट्यावर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
चिखली तालुक्यातील बेराळा फाट्यावर कामगार मजुरांना जेवण तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामधून दररोज ४० ते ५० गाड्या गावा गावात जावून घरपोच जेवण पोहचवीतात. त्यामध्ये एका वाहन चालकाकडे दोन पेक्षा जास्त गावे असल्यास वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. अशा या घाईगडबडीत एक गाडी क्र एम एच ४० सीडी ६७७२ चे चालक जेवण पोहचून परत बेराळा कडे भरधाव वेगात येत होती . मात्र समोर मेरा खुर्द फाट्यावर प्रवाशांना बस मधून खाली उतरून देत असलेल्या चिखली ते बीबी एसटी बस क्र एम एच ४० एन ८१८९ ला अचानक पाठीमागून धडक बसली. त्यामध्ये धडक बसल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. परंतू माल वाहक गाडीची पाठीमागून धडक बसल्याने जिवीत हानी टळली . वाहनाला बसलेल्या धडकेचा व आरडाओरडा केल्याचा आवाज येताच मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले . परंतू कोणीही जखमी नसून वाहनांचे किरकोळ नुकसान झाले .
Leave a Reply