‘महायुती’चा निर्धार श्वेताताईच पुन्हा आमदार!; २८ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
- आ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत 'महायुती'ची समन्वय बैठक उत्साहात; घटक पक्षांनी केले प्रचाराचे काटेकोर नियोजन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिखली मतदारसंघातून महायुतीच्यावतीने आ. श्वेताताई महाले पाटील यांना भारतीय जनता पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी काल घोषित केली. सौ. महाले पाटील यांच्या उमेदवारीचे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी उस्फूर्त स्वागत केले असून, प्रचाराच्या नियोजनासंदर्भात तसेच महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या नियोजनासाठी महत्त्वाची समन्वय बैठक आज (दि.२१) श्री अंबिका अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पिरिपा आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या आपला उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोबर रोजी सादर करणार असून, त्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.
आ.श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, मनोज दांडगे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, भाजपा चिखली तालुकाध्यक्ष सुनिल पोफळे, बुलढाणा तालुका अध्यक्ष अॅड. मोहन पवार, जिल्हा सरचिटणीस देवीदास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, सुरेंद्रप्रसाद पांडे, विजय अंभोरे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मायाताई म्हस्के, अॅड. सुनील देशमुख, मंदार बाहेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, विलास वसु, कृष्णकुमार सपकाळ, सुभाष देव्हडे, शेखर बोंद्रे, समाधान जाधव, प्रशांत एकडे, सतीश पाटील, जितेंद्र पुरोहित, गजानन मोरे, विनायक भाग्यवंत, शिवाजी शिराळे, सिद्धेश्वर ठेंग, मुक्तार खान पठाण हे महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या या समन्वय बैठकीला आ. श्वेताताई महाले यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, मनोज दांडगे, रामदासभाऊ देव्हडे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, प्रशांत एकडे, सुभाष देव्हडे यांनी देखील या बैठकीत आपले विचार मांडले गटप पक्षातील नेत्यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांना मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसण्याचे आवाहन यावेळी बोलताना केले.
श्वेताताईंचा उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोबरला!
चिखली मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार श्वेताताई महाले या येत्या दि. २८ ऑक्टोबररोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यासाठी २८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता खामगाव चौफुली येथे महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येणार असून, तेथून महायुतीची रॅली सुरू होणार आहे. ही रॅली राजा टॉवर येथे आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर होईल. या रॅलीचे नियोजन तसेच महायुतीतर्फे आयोजित केल्या जाणार्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे नियोजन करणे, निरोप व्यवस्था, दैनंदिन प्रचार दौरा व प्रचार यंत्रणा तसेच समन्वय यांनी करायची कामे आदी विषयांवर या समन्वय बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली व निर्णय झाले.
महाआघाडीत जागावाटपाचा घोळ सुरूच; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा!