Breaking newsLATUR

लातूरच्या अरीबाचे जागतिक विक्रम; काहीही विचारा सांगते क्षणात!

लातूर (गणेश मुंडे) :  येथील चिमुकली कु. अरीबा अय्युब शेख याने वयाच्या अडीच वर्षात विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत.  त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कु.अरीबा व त्याच्या माता-पिता यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून शाल, पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन सन्मान केला. कु. अरीबा अय्युब शेख वय २.५ वर्षे रा. लातूर ता.जि. लातूर या चिमुकलीने आपल्या बुद्धिमत्तेने एवढ्या कमी वयात जगातील सर्व देशांची नावे,  त्यांच्या राजधान्या,  राष्ट्रध्वज, जगातील नकाशावर कुठेही हात ठेवल्यानंतर त्या देशाची माहिती ई. बाबी काही सेकंदातच सांगते.

या चिमुकलीच्या या बुद्धीकौशल्याची दखल घेऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन (World book of Record London) इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड सुपर टायलेंटेड किड (International book of record super talented kid), एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ( Asia book of record),  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India book of record),  ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड (OMG book of record) ई. जागतिक आणि राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद घेण्यात आली आहे. सर्वांनाच कुतूहल वाटावे असे हे पराक्रम कु. अरीबा याने केला आहेत.  याचे श्रेय त्याच्या माता-पिता यांना जातो असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.  कु. अरीबा अय्युब शेख ही चिमुकली लातूर जिल्ह्याची असून लातुर जिल्हा प्रशासनास याचा सार्थ अभिमान असल्याचे कु. अरीबा शेख व त्याचे पिता अय्युब वहीदोद्दिन शेख आणि आई श्रीमती आस्मा अय्युब शेख यांचे जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात येऊन कु. अरीबाच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हाधिका-यांनी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनीही यावेळी अरीबा व त्याच्या माता-पिताचे कौतुक केले.

अरीबाचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचे वडील अय्युब शेख, आई आसमा शेख, काका ताहेर शेख इत्यादी परिश्रम घेत असल्याचे त्याच्या वडिलाने सांगितले. अरीबाचे आई-वडील दोन्ही उच्चशिक्षित असून वडील अय्युब शेख हे आय.आय.टी. मद्रास येथून एम टेक केले असून एका प्रतिष्टीत सॉफ्टवेअर कंपनीत व्यवस्थापक आहे. आई आस्मा शेख सुद्धा एम.एस्सी. (सोफ्टवेअर) आहेत.  यावेळी अरीबाचे वडील अय्युब वहीदोद्दिन शेख, आई श्रीमती आस्मा अय्युब शेख, काका ताहेर वहीदोद्दिन शेख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीराम वाघमारे, गोपाळ शिंगडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक वेंकटेश कौरवाड, गोविंद माने, जिल्हाधिकारी कार्यालय येथील इतर अधिकारी कर्मचारी ई. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!