LATUR

ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

लातूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – उदगीरपासून काही अंतरावर अहमदपूर रोडवर सोमवारी (दि. २५) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास एका ट्रक चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जानवळ (ता. चाकूर) येथील दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला आहे. तर दुचाकी चालकाची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत पोलीस नाईक संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास उदगीर ते अहमदपूर रोडवरील हकनकवाडी पाटी ते तोंडार पाटीच्या दरम्यान उदगीरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच. ०४ एच. डी. ४२८७ च्या चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम. एच. २४ एक्स. ४५८७ च्या दुचाकीला जोराची धडक दिली.  या धडकेत दुचाकीस्वार विजय बाबुराव राठोड (वय ४१ वर्षे) रा. जानवळ ता. चाकुर हे जागेवरच ठार झाले.  तर दुचाकी वरील मयत विजय राठोड यांच्या पत्नी रेणुका राठोड (वय ३५ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या आहेत.  त्यांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  चाकूर तालुक्यातील जानवळ येथील राठोड दांम्पत्य काही कामानिमित्त उदगीरला येत हाेते.  परंतु उदगीर जवळ आल्यानंतर समोरून भरधाव येणाऱ्या एका यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.  घटनास्थळावरून ट्रक चालकाने ट्रकसह पळ काढला होता. परंतु उदगीर ग्रामीण पोलिसांनी ट्रक सह चालकास ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  याप्रकरणी शामराव लक्ष्मण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गु. र. न. ३३४ / २२ कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ भादवी आणि सह कलम १८४, १३४ / १७७ मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!