कारे बा ss सूर्य…… शिंदे गटात तर गेला नाही ? राज्यातील राजकारणाचे सोशल मिडीयावर विडंबन !
संग्रामपूर जि.बुलडाणा ( काशिनाथ मानकर) :- सततच्या पावसामुळे दहा दिवसा पासून सुर्य दर्शन नाही . सुर्य गेला तर नाही रे गड्या शिंदे गटात . हा दोन युवा शेतकऱ्यां मधील संवाद . मी तुमच्यात राहत नाहीरे गडे हो मी चाललो शिंदे गटात असा बाल वयावतील विद्यार्थांचा खेळ . अशा एक नव्हे तर अनेक पोस्ट सोशल मिडीयावर सध्या फिरत असल्या तरी या मधून सध्याच्या राजकारणाची टर उडवल्या जात आहे .
राज्यातील राजकारणावर सोशल मिडीयावर व्यक्त होत असलेल्या ह्या पोस्ट वार विनोदी वाटत असल्या तरी जनतेला अंतरमुख करायला लावणाऱ्या निश्चितच आहेत . सत्तांतराच्या या राजकीय आट्यापाट्याच्या खेळात खासदार – आमदार मशगुल असले तरी सामान्य जनता या राजकारणातील खेळाकडे उपहासाने च पाहत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे . तसाही पाऊस सुरूच सुरु असल्याने आठ दहा दिवसा पासुन सुर्य दर्शन नाही . अशातच दोन ग्रामीण भागातील युवक शेतकरी अंगावर छत्री घेऊन शेतातील उंच भागावर बसले पाऊस कधी बंद होऊन सुर्य दर्शन कधी होइल अशी चर्चा करत असतांना त्यातील एकजण म्हणतो दिसत नसलेला सुर्य शिंदे गटात तर नाही गेला ? यावर खसखस पिकते . दुसऱ्या एका पोस्ट मधे ४ / ५ बाल मित्र शाळेच्या मैदानात बसले असतांना यातील एक जण उठतो व म्हणतो मी तुमच्यात राहत नाही रे…. भौ मी चाल लो शिंदे गटात . राजकारणी मंडळीचा उपहास करणाऱ्या अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांचे जाम मनोरंजन होत असले तरी त्यापेक्षा दुप्पट चिड व्यक्त होत आहे . राज्यातील सध्याच्या राजकारणाच्या खिल्ली उडवणाऱ्या अशा अनेक पोस्ट जनतेला चिंतण करायला लावणाऱ्या नक्कीच आहेत . एक सव्वा महिन्यापासून हा सत्तांतराचा खेळ आपले लोक प्रतिनिधी खेळत असतांना सध्या सुरु असलेला सततचा पाऊस व काही भागात झालेली अतिवृष्टी यामुळे पीक हातुन जाण्याची वेळ आली आहे . जिल्हयाला पालक मंत्री नाही आपदग्रस्त शेतक ऱ्यांची व्यथा जाणुन घेण्यास कोण त्या खासदार – आमदाराला ब्र शब्द बोलण्यास बिलकुलच फुरसत नाही . त्यांच सार काही चित सत्ता पालट मधेच आहे . राज्यातील सरकार बहुमता अभावी या अगोदरही अनेकदाकोसळले . पण लगेच दुसरे राज्य सरकार सत्तेत आले व राज्य कारभार तात्काळ सुरु केला ही बाब साऱ्या जनतेला माहीती आहे . पण या सध्याच्या डिजीटल युगात सरकार पाडल्या गेले असले तरी नव्या सरकारात फक्त मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हे दोघेच आहेत . विस्तार होऊन अजुनही खाते वाटप नाही . संबंधीत खात्यांना एवढ्या दिवस मंत्री नसणे ही राज्यातील पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरीक व्यक्त करत आहेत . सारा खेळ चालु आहे फक्त कोण शिंदे गटात तर कोण उद्धव गटात या वादाला चर्चेला जनता आता कमालीची कंटाळली आहे . कोण कोणत्याही गटात असले तरी या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव तर मतदार संघाचे आमदार डॉ . संजय भाऊ आहेत . सतत च्या पावसाने पिकं खराब झाली काही भागात अतिवृष्टी होऊन पीक हातचे निघुन जाण्याची वेळ आली असतांना या दोघांपैकी एकानेही इकडे येऊन बळीराजा शेतक ऱ्यांची व्यथा जाणून घेतली नाही . विनोदाने म्हटल्या जाते कि जनता ही राजहंस पक्षासारखी आहे जस कि हा पक्षी भांड्यातील पाणी मिश्रीत फक्त त्यातील दुध पितो पाणी तसेच भांड्यात राहु देतो . तसच सामान्य जनतेला हे सार काही समजते व उमजते सुदधा . पण उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय त्यांचेकडे काही पर्याय नाही चिड व्यक्त करण्याशिवाय या जनते जवळ आहेच दुसरे काय अशा प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहेत . काय झाडी काय डोंगार काय हाटील सार काही त्यांच ओक्के असतांना आमच काय ? असा सवाल नागरीक व्यक्त करत आहेत ..