मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानंतर पीकविमा कंपनीने पीकविम्याचे पैसे जमा करण्यास सुरूवात केली असली तरी, मेहकर व लोणार तालुक्यांतील अनेक शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. उर्वरित पीकविमा रक्कम आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला आहे. पीकविमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू करू, आणि राज्य सरकारलाही धारेवर धरू, असेही डॉ. टाले यांनी ठणकावले.
डॉ. टाले म्हणाले, की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विविध आंदोलनांच्या माध्यमातून अखेर पीकविमा कंपनी व राज्य सरकारने पीकविम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून, मात्र मेहकर व लोणार तालुक्यातील सन २०२३-२०२४ च्या खरीप व रब्बी पिकांचा बर्याच शेतकर्यांना पीकविमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकर्यांना तात्काळ रब्बी सोयाबीन व खरिपाचा हरभरा गहू रिजेक्टेड/ अक्सेप्टेड सरसकट पीकविमा मिळावा, याकरिता गोहोगांव, पांगरखेड, नागापूर, बेलगांव या गावांमधील शेतकर्यांकडून पीकविम्याचे फॉर्म भरून घेऊन पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने तसेच पीकविम्यासाठी शेतकर्यांची एकजूट करत, मोठी लढाई मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या लढाईमध्ये शेतकर्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील सगळ्या शेतकर्यांना पीक विमा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिलेला आहे.
डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांचा प्रचार जोमात; ’ताई’ बिघडविणार आमदारकीची स्वप्न पाहणार्या ‘भावां’ची गणितं!