MEHAKARVidharbha

डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांचा प्रचार जोमात; ’ताई’ बिघडविणार आमदारकीची स्वप्न पाहणार्‍या ‘भावां’ची गणितं!

- आयात उमेदवारांनाही बसणार फटका; यंदा महिलाच आमदार करण्याचा जनमाणसाचा निर्धार!

लोणार/मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात महायुती सोडता अद्याप महाआघाडीने व इतर पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाहीत. परंतु, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कट्टर समर्थक व शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणार्‍या शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी मात्र जोरदार प्रचाराला सुरूवात केली असून, त्यांना मतदारसंघातून जनमाणसांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या धडाकेबाज प्रचारामुळे आमदारकीची स्वप्ने पाहणार्‍या अनेक भावांची गणिते बिघडू लागली आहेत. ‘मतदारसंघाला विकास हवा, म्हणून ऋतुजाताईसारखा आमदार हवा’, अशा घोषणा आता गावागावांतून उमटू लागल्या आहेत.

मेहकर विधानसभा मतदारसंघात आयात व निष्क्रिय उमेदवारांचे अतिक्रमण वाढत चालले असून, स्थानिक मतदारांना भुरळ पाडण्यासाठी त्यांचे सोशल, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियामधून जोरदार मार्वेâटिंग सुरू झाले आहे. मतदारसंघाशी कोणताही संबंध नसताना आयात उमेदवाराची यादी वाढत चालली आहे. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या मागील पंधरा वर्षाचा आढावा घेतला असता, मेहकर विधानसभा निवडणूक स्थानिक उमेदवार नसल्यास एकतर्फी होण्याचे दाट संकेत आहेत. त्यामुळेच डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर व स्थानिक उमेदवारामुळे हा धोका टळत असून, आ. रायमुलकर यांना मतदारसंघाचा विकास करण्यात अपयश आल्याने मतदार आता डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनाच विधानसभेत पोहोचविण्यासाठी एकवटले असल्याचे दिलासादायक चित्र या मतदारसंघात निर्माण झालेले आहे.
डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी मेहकर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. अन् त्यांच्या भेटीगाठीसुद्धा वेगाने सुरू आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पत्रक छापून प्रचारसुद्धा सुरू केला आहे. त्या एकमेव महिला उमेदवार राहणार असल्याने त्यांना महिलांची सर्वाधिक मते मिळाली तर मेहकर मतदारसंघात परिवर्तन घडू शकते. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून मतदारसंघातील लाखो भावांना राख्यासुद्धा पोहोचत आहेत. या भावांनी बहिणीच्या जिव्हाळ्याला मतंरुपी आशीर्वाद देऊन जपले तर क्रांती होईलच, अशी चर्चा आहे. अशाप्रकारे, एक ताई अर्थातच डॉ. ऋतुजाताई चव्हाण ह्या आमदारकीची स्वप्न पाहणार्‍या अनेक राजकीय भावांची गणितं बिघडवू शकतात, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांच्यासह त्यांची सर्व टीम मोठ्या जोमाने कामाला लागली आहे. डॉ. ऋतुजाताई चव्हाण ह्या विधानसभेची पायरी चढतीलच, असा विश्वास ते सातत्याने व्यक्त करीत आहेत.


लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळशक्ती पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे फलित म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघात ५४ हजाराचे वर मतदान मिळाले आहे. या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींना समोर जाऊन रोष पत्करण्याचे, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि ग्राउंड लेव्हलला बूथनियोजनापासून मतदान करून घेण्यापर्यंतची रणनीती डॉक्टर ज्ञानेश्वर टाले आणि ऋषांक चव्हाण यांनी सुनियोजितपणे पार पाडली होती. ऋष्यांक चव्हाण यांनी डोणगाव येथील सहकारक्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त करून युवा उद्योजक म्हणून आपली प्रतिमा विकसित केली आहे. त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण (एमबीबीएस) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. महिलांचे सबळीकरण, सक्षमीकरण केवळ एक महिलाच समजू शकते. या अनुषंगाची मुखप्रचार यंत्रणा गावोगावी सक्रिय होत आहे. अनेक वर्षापासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुरूषाचे अधिपत्य आहे. अशावेळी महिलाचे प्रतिनिधित्व मतदारसंघातील इतर महिलांना आपला स्वाभिमान जागविण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघाचा रखडलेला विकास, बोकाळलेला जातीयवाद आणि शेतकर्‍यांकडे होत असलेले दुर्लक्ष व त्यामुळे हतबल झालेला शेतकरी, कष्टकरी वर्ग यांना ऋतुजाताईंचा मोठा आधार निर्माण झाला असून, ते आपली मतरूपी आशीर्वाद डॉ. ऋतुजाताईंना देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!