– ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
– सीसीटीव्ही निगरानीखाली येणारे चिखली तालुक्यातील ठरले पहिले गाव!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील अंत्री कोळी हे गाव सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या निगरानीखाली आले असून, उपसरपंच सौ. वर्षा गिरी, सरपंच व ग्रामस्थांनी गावाला कॅमेर्याच्या तिसर्या डोळ्यामार्फत करडी सुरक्षा प्रदान केली आहे. या सीसीटीव्ही सुविधेचे रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्याहस्ते थाटात उदघाटन पडले. या माध्यमातून गावातील अनैतिक प्रकार टळतील, आणि गाव सुरक्षित झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत, उपसरपंच व ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक केले.
अंत्री कोळी येथून धाड, भडगाव, रायपूर, सैलानी इकडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर बरेच अपघात घडत असतात. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील सीसीटीव्ही कॅमेर्यांची गरज होती. त्यामुळे रायपूरचे ठाणेदार दुर्देश राजपूत यांनी उपसरपंच सौ. वर्षा गिरी यांच्यासह ग्रामस्थांना गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली होती. त्यामुळे गावाची सुरक्षा व पोलिसांचा आग्रह पाहाता, अंत्री कोळी येथील उपसरपंच सौ. वर्षा विठ्ठल गिरी, सचिव अर्चना हिवाळे यांनी विलंब न लावता, पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या आवाहनाला होकार दिला आणि दिनांक १५ ऑगस्टरोजी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्याहस्ते सीसीटीव्ही कॅमेर्यांचे उद्घाटन करण्यात आले. अंत्री कोळी गावामध्ये ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, चिखली-धाड रोड, अंत्री कोळी ते रायपूर रस्त्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप, हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर परिसर तसेच गावातील काही चौकामध्ये हे कॅमेरे लावण्यात आले आहे. हे कॅमेरे थेट रायपूर पोलिस स्टेशनला कनेक्ट आहेत. त्यामुळे रायपूर पोलीस स्टेशनची अंत्री कोळी येथील प्रत्येक हालचालीवर नजर असून, त्यामुळे अंत्री कोळी येथे कोणत्याही प्रकारचे या पुढे अपकृत्य होणार नाही. तसेच या परिसरात जे चोरीचे प्रमाण आहे, त्यालादेखील आळा बसणार आहे.काल, १५ ऑगस्टरोजी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी साकेगाव येथे शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करून अंत्री कोळी येथील सीसीटीव्ही कॅमेर्याचे उद्घाटन केले. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सचिव अर्चना हिवाळे, सरपंच सुभाष ठेंग, रामेश्वर वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भारत वाघ, सुरेश वाघ, समाधान हिवाळे, अमोल वाघ, साहेबराव वाघ, दिलावर पटेल, संदीप इंगळे, समाधान गाडेकर, अमोल मोरे, कृष्णा भारती, समाधन मोरे, प्रदीप अपार सर, ऋषी डुकरे व गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सरपंच सुभाष ठेंग, उपसरपंच सौ. वर्षा विठ्ठल गिरी, सचिव अर्चना हिवाळे यांचे आभार मानले व अंत्री कोळीने जे सीसीटीव्ही बसवण्याचे काम केले आहे ते इतर गावाने ही करावे, असे आव्हान केले.