DEULGAONRAJASINDKHEDRAJAVidharbha

पांगरी उगले-जयपूर गट ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार!

– कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले – जयपूर येथील प्रभारी सरपंच तथा उपसरपंच व सचिव यांनी संगनमताने बोगस कामे दाखवून सुमारे तीन लाख ३५ हजार रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार तेथील चार ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी सिंदखेडराजा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. या लाखो रूपयांच्या अपहाराची आठ दिवसांत सखोल चौकशी न झाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रारकर्त्यांनी या निवेदनाच्या प्रती खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व मंत्री तथा आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, बुलढाणा जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत. मौजे पांग्री उगल- जयपूर येथील ग्रामपंचायत सदस्य परशुराम नारायणराव उगले, जयकांत आत्माराम राठोड, शे.रसुल शे.इद्रीस, सौ.ज्योती संदीप उगले या चार सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना नमूद केले आहे की, मौजे पांग्री उगले येथील ग्रामपंचायत सरपंचपद रिक्त असून, ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा कारभार प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच सौ.मंजुळा मनोहर पवार यांच्याकडे आहे. ग्राम सचिव कैलास दामोधर झिने हे काम पाहात आहेत. पांग्री उगले-जयपूर येथील उपसरपंच व सचिव यांनी १५ व्या वित्त आयोगातून बोगस कामे दाखवून कामे न करता सुमारे ३,३५,५६४ रुपयांचा अपहार केला आहे.१५ व्या वित्त आयोगातून बोगस कामे दाखवून काढलेल्या रकमांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये (१) सिमेंट रस्ता ८५ हजार रूपये, (२) सिमेंट रस्ता ७४,२०० रूपये, (३) सिमेंट रस्ता १,१०,६०० रूपये, (४) अंगणवाडी दुरूस्ती -४५,४०० रूपये आणि (५) नाली बांधकाम धापे २०,३६४ रूपये अशी एकूण ३ लाख ३५ हजार ५६४ रूपये एवढ्या मोठ्या रकमेची प्रत्याक्षात कामेच न करता कामे केलेली दाखवून परस्पर रकमां काढून गावकर्‍यांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी. तसेच झालेला चौकशी अहवाल व त्यांनी दाखविलेल्या कामाची एम.बी.ची प्रत आम्हाला तात्काळ देण्यात यावी. सात दिवसांत तक्रारीची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास आम्ही नाईलाजाने पंचायत समिती सिंदखेडराजा समोर आमरण उपोषणाचा बसू, असा इशारा दिला आहे. सदर तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!