पालकमंत्री तानाजीराव सावंतांच्या ‘विकासरथा’ने विरोधकांची भंबेरी उडविली!
– विकासकामांचा लेखाजोखा घेऊन प्रा. डॉ. तानाजीराव सावंत जनतेच्या दरबारात!
– विरोधकांच्या आरोपांना आपल्या विकासकामांनी गावोगावी ‘स्क्रीन’च्या माध्यमातून दिले जात आहे चोख प्रत्युत्तर!
धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी) – भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी प्रचाराला सुरूवात करताच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीला रंगत येऊ लागली आहे. ‘फक्त नमस्कार नको काम पाहिजे, जनतेला आता विकास पाहिजे’ या टॅगलाईन खाली ना. प्रा. सावंत यांनी आपल्या विकासकामांचा लेखाजोखाच गावोगावी ‘स्क्रीन’ घेऊन फिरणार्या वाहनांच्या माध्यमातून मांडला आहे. विरोधकांच्या सर्व आरोपांना ना. सावंत यांनी आपल्या विकासकामांतून चोख प्रत्युत्तर दिल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.
‘कृष्णे’चे पाणी मराठवाड्यात आणण्याची अशक्यप्राय योजना पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याने येत्या मे महिन्यापर्यंत ‘उजनी’चे पाणी भूम-परंडा-वाशी, व कळंब तालुक्यात खेळणार आहे. यासह शिवजलक्रांती मोहिमेच्या माध्यमातून दुष्काळावर केलेली मात आणि हिरवीगार झालेली शेतशिवारे जनता पाहातच आहे. यासह सर्व केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांचा लेखाजोखाच ना. सावंत यांनी फिरत्या वाहनांवर लावलेल्या स्क्रीनद्वारे भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील मतदारांसमोर सप्रमाण मांडला आहे.
गावोगावी या स्क्रीनवरील चित्रफित पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दीही होत आहे. ना. सावंत यांच्या विरोधकांकडे भावनिकतेव्यतिरिक्त कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. तर या सर्व आरोपांना मतदारसंघात केलेल्या हजारो कोटींच्या आपल्या विकासकामांनी ना. सावंत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे यावेळेसही विधानसभेची लढाई एकतर्फीच होण्याची चिन्हे आहेत. काल, दि.८ ऑगस्टपासून ना. सावंत यांच्या विकासकामांची माहिती जनतेला देणारे विकासरथ सद्या भूम, परंडा, वाशी तालुक्यांत फिरताना दिसत आहेत. अद्याप विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नसताना प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी प्रचाराचा धडाका उडविला असल्याने त्यांची प्रचारात आघाडी दिसून येत असून, त्यांचे विरोधक मात्र अद्याप गाठीभेटींत गुंतलेले दिसून येत आहेत.