Aalandi

पोलीस उपनिरीक्षकपदी कु.रसिका कुटे हिची निवड

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदाचे परीक्षेत केळगाव येथील शेतकरी कुटुंबातील कु. रसिका नितीन कुटे या तरुणीने उज्ज्वल यश संपादन केले. तिच्या यशस्वी वाटचालीतून केळगावच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला असून केळगावचे वैभवात वाढ केली आहे.
कु. रसिका नितीन कुटे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन (PSI) पोलीस उपनिरीक्षक पदी कु. रसिका नितीन कुटे हिची नियुक्ती झाली. या निमित्त केळगावात समस्त ग्रामस्थ आणि कुटे कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्र परिवार यांनी जल्लोष साजरा केला. कु.रसिका कुटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगाव मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विविध सेवाभावी व्यक्ती, संस्था पदाधिकारी, केळगाव ग्रामस्थ यांनी जल्लोष करीत कु.रसिका कुटे यांचे अभिनंदन करून सत्कार केल्याची माहिती केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांनी दिली. रसिका हि नितीन सदाशिव कुटे यांची कन्या असून त्यांनी नोकरी आणि शेतीच्या जोडधंद्याच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलांचे शिक्षणाकडे लक्ष दिले. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना शिक्षण दिले. रोजच्या दगदगीच्या जीवनातून मुलीला पाहिजे त्या गोष्टीतून सहकार्य केले. तिच्या या संघर्षामध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आई – वडिल, आजी, आजोबा, चुलते, काकी इतर नातेवाईकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!