Head linesMaharashtraWomen's WorldWorld update

पूजा खेडकर दुबईत पळण्याची शक्यता कमी; आईप्रमाणे कुठे तरी लपून बसली असेन?

– पोलिसांनी तिच्या वडिल व नातेवाईकांच्या फोनवर लक्ष केंद्रीत केले तरी पकडली जाईल?

मुंबई/नगर (खास प्रतिनिधी) – केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक करून सनदी अधिकारी पद गैरमार्गाने प्राप्त करण्याचा आरोप असलेली वादग्रस्त पूजा खेडेकर ही युवती दुबईत पळून गेली असावी, असे वृत्त काही माध्यमांनी दिलेले आहे. परंतु, पूजाला आणि तिच्या आईला ओळखणारे बहुतांश सर्वचजण ही शक्यता खासगीत बोलताना नाकारत आहेत. पूजाची आई मनोरमा खेडकर या जशा अटक टाळण्यासाठी कोकणातील एका लॉजमध्ये खोटे नाव धारण करून लपून बसल्या होत्या. पूजादेखील आईप्रमाणेच देशातच कुठे तरी लपून बसली असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे व दिल्ली पोलिसांनी पूजाच्या वडिलांसह तिच्या काही नातेवाईकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले तरी, कुठे तरी लपून बसलेली पूजा हाती लागेल, अशी शक्यताही खासगीत बोलताना तिच्या निकटवर्तीयांकडून नाव उघड न करण्याच्या अटीवर वर्तविली जात आहे.

यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकर हिला दणका दिला. त्यानंतर अटकेच्या भीतीने पूजा खेडकरने दुबईत पळ काढला असल्याची चर्चा रंगली आहे. चौकशीमध्ये उत्तर देण्याची टाळाटाळ केल्यानंतर ती नॉट रिचेबल झाली असून, दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पुणे किंवा दिल्ली पोलिस कोणत्याहीक्षणी पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता पाहाता, पूजा सद्या कुठे तरी दडून बसलेली आहे. तसेच, वकिलांमार्फत ती सर्वोच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत असावी, अशी शक्यता आहे. पूजा आणि तिची आई मनोरमा या दोघीही तशा अत्यंत चाणाक्ष व हुशार महिला असून, त्यांना कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गुन्ह्यांत या दोघीही आरोपी झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. पूजा दुबईला जाणे वैगरे शक्य नाही. कारण, तिच्या पाळतीवर पोलिस व गुप्तचर होते. ती देशातच कुठे तरी लपून बसली असावी, आईप्रमाणे तिनेही खोटे नाव व कागदपत्रे धारण केली असावीत, अशी शक्यता तिच्याशी संबंधित निकटवर्तीय खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.
———–
Pooja Khedkar: प्रचंड चर्चेत होती पुण्याची IAS पूजा खेडकर, तडकाफडकी वाशिमला बदली का? - government action against trainee pune ias pooja khedkar she was accused of occupying her senior chamber ...वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पूजा खेडकर हिने यूपीएससीची दिशाभूल करून पद मिळवल्याचा आरोप आहे. पूजा हिने इतर मागासवर्ग प्रवर्गातून १२ वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याची माहिती उघड झाली. पद मिळविण्यासाठी तिने अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्रही दिले. प्रशिक्षणार्थी असतानाही वरिष्ठांना धमकावणे, त्यांच्या केबिन बळकावणे अशा प्रकारामुळे तिचे पुण्यात पितळ उघडे पडले. याप्रकरणी यूपीएससी बोर्डाने पूजाचे प्रशिक्षण थांबवून तिला मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले. खेडकर तिथे मसुरीतील अकादमीत हजर राहतील, असे वाटत होते, पण तेथे न जाता ती तेव्हापासूनच नॉट रिचेबल आहे. पूजा खेडकर हिचे वडिल दिलीप खेडकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. असे असले तरी पूजा खेडकरने ओबीसी कोट्यातून क्रिमीलेअरचा लाभ घेतला होता. इतकेच नाही तर दिव्यांग असल्याची चुकीची प्रमाणपत्रही सादर केली होती, असे आरोप होते. वाशिममध्ये बदली झाल्यानंतर तिला काम थांबवण्याचे आदेश दिले होते. तसेच पुन्हा मसुरीला बोलावण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच चौकशीसाठी अटकेची मागणी केली होती. याविरोधात पूजा खेडकरने पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आणि अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने तिचा हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिला पोलिस शोधून काढून अटक करण्याच्या तयारीत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!