Breaking newsHead linesPolitical NewsPolitics

लोकसभेपाठोपाठ भाजप विधानसभा निवडणुकीतही ‘रेड झोन’मध्ये!

– अजित पवारांच्या साथीचा विधानसभेलाही फटका बसण्याची शक्यता!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीतही दिलासादायक वातावरण नसल्याचे राज्यातून पुढे आले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली असून, आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात अनुकूल मत असल्याचे निरीक्षणही पुढे आलेले आहे.

भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. २०१४ मध्ये भाजपनं राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होता. तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपनं १०५ जाागांपर्यंत मजल मारली होती. पण यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मोफत योजना व आश्वासनांची खैरात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार वाटत असले तरी त्यातून सरकारची जनमाणसात नकारात्मकच प्रतिमा तयार झालेली आहे. हे रेवडी सरकार पुन्हा सत्तेवर येणे शक्य नसल्याची शक्यता राजकीय धुरिणांकडून वर्तविली जात आहे. भाजपच्या मदतीने आपण पुन्हा सत्तेत येऊ याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटते. पण भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. २०१४ मध्ये भाजपने राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होते. तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपने १०५ जाागांपर्यंत मजल मारली होती. पण यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर अवबंलून असल्याचेही राजकीय सूत्राने सांगितले आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना सोबत घेतल्याने रा. स्व. संघ भाजपवर नाराज झाला होता. संघाच्या अनुमानानुसार अजित पवारांमुळे भाजपला मोठा फटका बसलेला आहे. लोकसभेतील कामगिरी पाहता, अजित पवार गटात मोठी अस्वस्थता असून, त्यांचे अनेक आमदार शरद पवारांकडे जाऊ शकतात. तसे प्रयत्नही अनेकांनी सुरु केले आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. अजित पवारांसोबतच्या हातमिळवणीचा फटका पक्षाला बसल्याचे, त्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे विश्लेषण संघाशी संबंधित नियतकालिकांनी केलेले आहे. ‘ऑबझर्व्हर’ आणि ‘विवेक’ने अजित पवारांसोबतच्या युतीचा भाजपला नेमका कसा फटका बसला, यावर प्रदीर्घ लेख लिहिले आहेत. भाजपच्याच नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील यावरुन अजित पवारांवर शरसंधान साधले होते. त्यानंतर त्याच अजित पवारांशी भाजपने हातमिळवणी केली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची गोची झाली. ज्यांच्याशी तात्त्विक पातळीवर संघर्ष केला, त्यांच्याशीच युती करण्याचा निर्णय भाजप, संघाच्या कार्यकर्त्यांना अनैतिक वाटल्याचे विश्लेषण ऑबझर्व्हर आणि विवेकने केले आहे. भाजपने अजित पवारांसोबतची युती तोडावी यासाठी संघाकडूनच दबाव टाकला जाऊ लागल्याची चर्चा आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!