CrimeHead linesSINDKHEDRAJAVidharbha

लोकांनी पाठलाग करताच गाडीतील दारूसाठा सोडून चालक पळून गेला!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – दारूचा भरमसाठ अवैध साठा घेऊन जाणार्‍या गाडीचा काही तरूणांनी पाठलाग केला. आपल्यामागे पोलिसच लागल्याचा संशय आल्याने, व त्यातच जुनी खटारा झालेली गाडी बंद पडल्याने  टाटा व्हिस्टा गाडीच्या चालकाने गाडी सोडून पळ काढला. या गाडीची माहिती ग्रामस्थांनी किनगाव राजा पोलिसांना देतात, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व लाखो रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. दरम्यान, काही दारूबहाद्दरांनी मोक्याचा गैरफायदा घेत, गाडीतून बर्‍याच दारूबाटल्या लंपास केल्याचेही कानावर येत आहेत. हा दारूसाठा कुणाचा आहे, व कुठे नेला जात होता, याचा पोलिस कसून तपास करत असून, पळून गेलेल्या चालकाचाही शोध घेतला जात आहे.
किनगाव राजा पो. स्टे.

सविस्तर असे, की दुसरबीड शिवारातून एक संशयास्पद टाटा व्हिस्टा गाडी जात होती. या गाडीत अवैध दारूचा साठा होता. गाडीचा संशय आल्याने काही युवकांनी तिचा पाठलाग केला. त्यामुळे पोलिसच गाडीच्या मागे लागले, असे वाटून गाडीच्या चालकाने गाडी मधातच उभी करून पळ काढला. यासंदर्भात किनगाव राजा पोलीस स्टेशनला सरकारतर्पेâ पोलिस कॉन्स्टेबल गणेश वारकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे, की दिनांक २७ जुलै रोजी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने टाटा व्हिस्टा कार क्रमांक एमएच २० बीसी २६७८ मध्ये एमडी मॅक्डाल नं ०१ ९० एमएल एकूण नग १६५ किंमत १३२०० रुपये, एमडी मॅक्डॉल नं ०१ ९० एमएल एकूण नग १०० किंमत ८,००० रुपये, एमडी मॅक्डाल ९० एमएल एकूण नग १०० किमत ८,००० रुपये, एमडी मॅक्डॉल नं ०१ च्या ९० एमएल एकूण नग १०० किमत ८,००० रुपये, एमडी मॅक्डाल नं ०१च्या १८० एमएल एकूण नग ४८ किमत ७२०० रुपये, एम डी मॅकक्डाल नं ०१च्या १८० एमएल एकूम नग ९६ किमत १,४४,००० रुपये, एमडी मॅक्डाल नं०१ च्या १८० एमएल एकूण नग ४८ किमत ७२०० रुपये, एमडी मॅक्डाल नं ०१ च्या ७५० एमएल एकूण नग १२ किमत ७,२०० रुपये, इंपेरीयर ब्ल्युच्या १८० एमएल एकूण नग १८० किमत २८,८०० रुपये, इंपेरीयर ब्ल्युच्या ९० एमएल एकूण नग १०० किमत ८५०० रुपये, इंपेरीयर ब्ल्युच्या ३७५ एमएल एकूण नग २४ किमत ७६८० रुपये, इंपेरीयर ब्ल्युच्या १८० एमएल एकूण नग ४८ किमत ७६८० रुपये, रायल स्टॅगच्या ३७५ एमएल एकूण नग २४ ८६४० रुपये, रायल स्टॅगच्या ९० एम एल एकूण नग १०० किमत ९५०० रुपये, रायल चॅलेंजच्या ९० एमएल एकूण नग १०० किमत ९५०० रुपये, रायल चॅलेंजच्या १०८ एमएल एकूण नग ३० किमत ५४०० रुपये, रॉयल चॅलेंजच्या ९० एमएल एकूण नग २०० किमत १९००० रुपये असे एकूण नग १,३७५ प्रमाणे किंमत १,६९,९०० रूपयांचा मुद्देमाल तसेच जुनी वापरती एक पांढर्‍या रंगाची टाटा व्हिस्टा कार जिची किमत अंदाजे ५० हजार रूपये असा एकूण २,१९,९०० रुपये असा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी अज्ञात ठिकाणावरून चोरुन आणला व गाडी बंद पडल्याने सकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास लोकांना पाहून गाडी सोडून पळून गेले, अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरुन काल, दिनांक २७ जुलैरोजी किनगावराजा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोहेकॉ सुधाकर गवई हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!