Breaking newsHead linesMaharashtraWorld update

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन; हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती

– राज्यपालपदांवर रा. स्व. संघ स्वयंसेवकांची वर्णी!
– महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी?

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्यकाळ संपलेल्या राज्यपालांच्या जागी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून, केंद्रातील एनडीए सरकारच्या शिफारशींवरून झालेल्या या नियुक्त्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या (आरएसएस) स्वयंसेवकांना स्थान मिळाले आहे. काल (दि.२७) मध्यरात्री एक वाजता राष्ट्रपतींनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करून त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे. बागडे यांच्या रूपाने संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे.

Imageराष्ट्रपती कार्यालयाकडून शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास १० राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांची घोषणा झाली. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. यंदा अस्थिर राजकीय परिस्थितीची शक्यता असल्याने राधाकृष्णन यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुत्तäया केल्याचे पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आले. विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच महाराष्ट्रातून उचलबांगडी केली गेली आहे. तथापि, त्यांची मुदत आज म्हणजेच २८ जुलै रोजी संपुष्टात आल्याचेही सांगण्यात येते. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले तामिळनाडूचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष व कोइम्बतूरमधून दोनदा खासदार राहिलेले ६७ वर्षीय राधाकृष्णन यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वप्रथम झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक देण्यात आली होती. मार्च २०२४ पासून त्यांच्याकडे तेलंगणाचाही कार्यभार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले राधाकृष्णन १९९८ व १९९९ या दोन टर्ममध्ये खासदार झाले. त्यापूर्वी भाजपच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. कॉलेज काळात ते उत्कृष्ट खेळाडू होते. राज्यशास्त्र विषयातून त्यांनी ‘साम्राज्यवादाचे पतन’ याविषयी पीएचडी केलेली आहे. दक्षिणेमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात विश्वासार्ह नेत्यांमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांचा समावेश होतो. सी. पी. राधाकृष्णन हे ६७ वर्षांचे आहेत. ते भाजपचे नेते असून त्यांचा जन्म ४ मे १९५७ साली तिरुपूरमध्ये झाला आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करु लागले. त्यांनी जनसंघासाठीही काम केले. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना काढलेली रथयात्रा चांगलीच गाजली होती. ही रथयात्रा तब्बल तीन महिने सुरु होती. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडून रात्री जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या, तसेच फेरनियुत्तäया करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. सदर नियुत्तäया या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असेही सांगण्यात आले आहे. सध्या सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत. आता सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये संतोषकुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्त करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे मागील पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. २०१९ साली भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१७ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोश्यारी राज्यपाल होते. त्यानंतर रमेश बैस यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते २८ जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवले. आता राज्याला सी. पी. राधाकृष्णन यांच्या रुपात २४ वे राज्यपाल मिळाले आहेत.


– नवे राज्यपाल खालीलप्रमाणे –

सी. पी. राधाकृष्णन् – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
संतोषकुमार गंगवार – झारखंड
रमण डेका – छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंदीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
के. कैलाशनाथन – पुद्दुचेरी (उपराज्यपाल)


हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना १९८५ मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले. १९९५ मध्ये रोजगार हमी मंत्री झाले. २००९ मध्ये फुलंब्रीतून त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा ते पुन्हा आमदार झाले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बागडे चक्क दुचाकीवर आले होते.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!