BuldanaBULDHANAVidharbha

बुलढाण्यात शनिवारी सिद्धार्थ खरात यांचा होणार ‘सेवा गौरव’ सोहळा!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी या आडवळणाच्या गावाचे भूमिपुत्र तथा राज्य सरकारचे माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांचा ‘सेवागौरव सोहळा’ येत्या शनिवार, दि. २७ जुलै रोजी बुलढाणा येथे गोवर्धन सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजन समितीचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी दिली.

सहसचिव गृहविभाग मंत्रालय मुंबई येथुन आपली ३० वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून १ जुलै २०२४ रोजी सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळें बुलढाणा गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बनसमोर कारंजा चौक येथे दि. २७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धार्थ खरात यांनी पार पडलेल्या कर्तव्यनिष्ठेचा ‘सेवागौरव सोहळा’ बुलढाण्यात पार पडणार आहे. याप्रसंगी बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक (भाईजी) या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्याहस्ते हा सेवागौरव होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीप्राप्त कादंबरीकार प्रा.डॉ. सदानंद देशमुख, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके व दिनेश गीते, गोखले इन्स्टिट्यूट दिल्लीचे डॉ. नरेश बोडखे, डी. टी. शिपणे आदींची उपस्थिती राहणार आहे.

सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्र शासन मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण व गृह विभागात काम केलेले आहे. या व्यतिरिक्त गृह, तुरूंग, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, महसूल, पणन, कामगार, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्यव्यवसाय, जलसंधारण, रोजगार हमी योजना, ऊर्जा व बंदरे इत्यादी विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे विशेष कार्य अधिकारी / खाजगी सचिव म्हणून काम केले आहे .मंत्री आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी व खाजगी सचिव सारख्या महत्वाच्या पदावर सर्वाधिक काळ काम करणा-या अपवादात्मक अधिका-यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, पुरूषोत्तम बर्डे, अ‍ॅड. जयसिंहराजे देशमुख, सुनील सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रविण गीते, सोहम घाडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!