BuldanaBULDHANAHead linesMEHAKARVidharbha
पाऊस, पुरामुळे नुकसानीची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून पाहणी!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल अतिमुसळधार पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या कोलारी आणि पिंप्री गवळी गावाला भेट देत, नुकसानीची पाहणी केली. यावेळी ना. जाधव यांनी नुकसानग्रस्त गावकर्यांशी संवाद साधला. तसेच अधिकार्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
दिनांक ७ जुलैला खामगाव आणि शेगाव तालुक्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शेतीसह मोठ्या प्रमाणात घरांचेही नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून तातडीने शेतकर्यांना मदत देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत. यावेळी त्यांच्यासोबत अधिकार्यांचा फौजफाटा व शिंदे गटाचे स्थानिक नेते हजर होते.
—-
दरम्यान, पीकविमा मोबदला न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मेहकर तालुक्यातील शेतकर्यांनी काल आंदोलन केले. रब्बी हंगामातील पीकविमा रक्कम त्वरित शेतकर्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशी मागणी या शेतकर्यांनी केली आहे.
———–