आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकीतून रक्तदान व आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यास युवक तरुण तसेच नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ७५ रक्तदात्यांनी रक्तदान तसेच २५० लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचे जतन करण्यात आले.
खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात आळंदी शहरात भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांचे विशेष प्रयत्नांतून खेड तालुका व आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपाध्यक्ष अशोक पाटील रंधवे, माजी नगरसेवक प्रकाशशेठ कुऱ्हाडे, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित खेड तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे व आळंदी शहर युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे यांच्या नेतृत्वात शिबीर उत्साहात झाले. नेत्र शिबिरात २५० वर लोकांनी नेत्र तपासणी केली. रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी रोहन कुऱ्हाडे म्हणाले, मागील कोरोना काळात देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खेड तालुका उपाध्यक्ष म्हंणून मोठी जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीचे भान ठेवत पक्ष संघटन वाढीसह मजबूत करण्याचा मानस आहे. सामाजिक बांधिलकीतून समाज सेवा तसेच शहराचा विकास साधण्याचा यापुढील काळात प्राधान्याने प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.