नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- शहादा विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर शहादा तालुक्यातील डामरखेडा ते गोमाई पूल पर्यंतच्या व प्रकाशा येथील पुला पासून तर कोरीट फाट्यापर्यंत कोणता हा रस्ता खराब झाल्याने अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.ठेकेदाराने मात्र कोणालाही न जुमानता कामा पूर्णच ठेवल्याने शेवटी जनता आता रस्त्यावर उतरली आहे.त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विसरवाडी ते सेंधवा हा रस्ता सुरुवातीला राज्यमार्ग होता.नंतर मला तर हा रस्ता राष्ट्रीय मार्ग करून या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला.त्यात शहादा तालुक्यातील डामरखेडा ते गोमाई नदीच्या पुलापर्यंत व प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलाचा दोन्ही बाजूस व कोरीट तालुका नंदुरबार फाट्यापर्यंत गेल्या दीड वर्षापासून काम अपूर्ण आहे.ठेकेदाराने दुर्लक्ष केलेले आहे परिणामी पूर्णतः खड्ड्यांचे साम्राज्य आहे.मोठ मोठाले खड्डे झाले आहेत.एवढ्या भागात वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.केव्हा अपघात होईल हे सांगता येत नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.विसरवाडी ते सेंधवा पर्यंत हा राष्ट्रीय मार्ग दीडशे किलोमीटरचा आहे.तीच परिस्थिती सुसरी धरणाचा जवळ तीन किलोमीटरचा रस्ता अपूर्ण स्थितीत आहे.
पावसाळ्यात तर फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.दोन अवजड वाहने पास करणे म्हणजे वाहनधारकांची कसरतच असते.वाहने अत्यंत हळू चालवावे लागतात.रोज दिवसभरातून रोज रहदारी ठप्प होत असते.गोमाई पुलाची तर भयानक अवस्था आहे.पुलावर एक प्रकारे खड्ड्यांची चाळण झाली आहे.संरक्षक कठडे तुटले आहेत.या जुन्या पुलाला लागून नवीन पुलाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.हा राष्ट्रीय महाराष्ट्र मार्ग गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारा असल्याने रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते.गुजरात राज्यातील सर्वात जास्त प्रमाणात मोठ मोठे कंटेनर या रस्त्याने येत असतात.त्यांच्यामुळे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान अपघात होत असतात.गेल्या तीन महिन्यात डामरखेडा ते गोमाई पूल दरम्यान अपघातांमध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.हा रस्ता अद्याप किती बळी घेईल हे सांगता येत नाही.प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ मोठाले गुडघाभर एवढे खड्डे होऊन पाण्याचे डबके असल्याने वाहनधारक त्याच्यात पडतात.नकाशा पुलापासून तर कोरीट फाट्यापर्यंत मोटर सायकलस्वाराला खाली उतरून जावे लागते.शेतकऱ्यांची शेतीमाल भरलेले वाहने सातत्याने अपघात ग्रस्त होत आहेत.
प्रकाशा ते काेरीट फाट्यापर्यंत तसेच डामरखेडा ते गोमाई पुलापर्यंतपर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात यावा या संदर्भात तीन वेळा रास्ता रोको आंदोलन झाले.शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन देखील दिले गेले होते.एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी यांनी डामरखेडा येथील गोमाई पुलाजवळ स्वतः भेट देऊन ठेकेदाराने आठ दिवसात रस्ता दुरुस्त करावा असे आदेश दिले होते.मात्र त्या ठेकेदाराने आदेशाकडे पाठ फिरवली.आता जनता रस्त्यावर उतरली आहे.
प्रकाशा हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.सातत्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.असे असतांना संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.वास्तविकता अपघातात अनेकांची बळी गेल्याने ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.डामरखेडा येथील सरपंच दत्तू नथू पाटील यांनी व शेतकऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने देखील केलीत.आता 24 जुलै रोजी याच रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात भव्य जनआंदोलन आहे.यानंतर जलसमाधी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्न गंभीरतेने सोडवणे आवश्यक आहे.
संबंधित ठेकेदाराने या राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना सुमारे 35 हजार झाडे तोडली.शासनाने झाडे लावण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.मात्र अद्याप एकही झाड लावण्यात आलेले नाही. एक प्रकारे डामरखेडा ते गोमाई पुल पर्यंत प्रकाशा येथील पुलाच्या दोन्ही बाजूस हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.