BULDHANAHead linesWorld update

‘नीट’ पेपरफुटीच्या लातूर कनेक्शनने कोचिंग क्लासेसचे हब बनलेली शहरेच संशयाच्या धुक्यात!

– लाखो रूपये देऊन पेपर फोडून धनदांडग्यांची पोरं पास होत असतील तर गरिब मुलांच्या खर्‍या गुणवत्तेवर हा अन्याय नाही का?
– नीट, जेईई, स्पर्धा परीक्षांच्या मायावी जालात अडकवून पालकांची कोट्यवधीची लूट; पण गुणवत्तेचे काय?

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कोटा ते लातूर या ‘नीट’ पेपरफुटीच्या कनेक्शनने गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधीवर आणि लाखो रूपये देऊन फुटलेला पेपर घेऊन नीट परीक्षा पास होणार्‍या कथित डॉक्टरांच्या गुणवत्तेवर यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाला असून, नीट, जेईई व स्पर्धा परीक्षांच्या वारेमाप जाहिरातींनी विद्यार्थी व पालकांना मायावी जाळ्यात अडकून त्यांच्याकडून कोट्यवधी रूपये उकळण्यासाठी आता कोचिंग क्लासेसचे हब बनलेली लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड ही शहरे आता यादृष्टीने संशयाच्या धुक्यात सापडली आहेत, अशी संतप्त टीका शिक्षण संस्थाचालक तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शेणफडराव घुबे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्य केली आहे.

NEET & uncleanशेणफडराव घुबे म्हणाले, की ‘नीट’ म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचा पेपर कोटा येथे फुटला व त्याचे कनेक्शन लातूरमध्ये सापडले. या प्रकरणी अनेक शिक्षकांना अटक झाली असून, अद्याप सीबीआय चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये काही विद्यार्थी बिहार व इतर राज्यातील असल्याचेही समोर येत आहे. ३२ लाख रुपये देऊन नीटची परीक्षा पास करून देण्याची हमी असल्याचे हे प्रकरण सर्वप्रथम कोटा येथून उघडकीस आले, व त्याचे कनेक्शन हे लातूर येथून असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील म्होरके न्यायालयीन कोठडीत असून, पोलीस व सीबीआय स्वतंत्रपणे तपास करीत आहे. हळूहळू या प्रकरणाचे धागेदोरे बाहेर येतीलच. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास याचे उगमस्थान लातूर तर याचे धागेदोरे कोटा येथे असले तरी त्याचे जाळे हे नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व अकोला या कोचिंग क्लासचे हब बनलेल्या मोठमोठ्या शहरात दडले असल्याचे बाहेर येईल. कारण कोचिंग क्लास चालविण्यासाठी मोठमोठाल्या जाहिरातीच्या जाळ्यात विद्यार्थ्यांना अडकवून, त्यापैकी काहींना पेपरमधील उत्तरे पुरवून, कोचिंग क्लासचे महत्व वाढविण्याचे स्पर्धेमधून, अशी प्रकरणे घडत असतात. त्यामुळेच कोचिंग क्लासचा फोफावलेला गोरखधंदा व खुलेआम बाजार सर्रासपणे लातूर, कोटा, औरंगाबाद, अकोला व नांदेड या मोठमोठाल्या शहरात सुरू आहे. एकट्या लातूरसारख्या शहरात लाखो विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासद्वारे नीट, जेईई, किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या मायावीजालमध्ये अडकवून कोट्यवधी रूपयांची उलाढाल या व्यवसायात सुरु आहे. ही सर्व मुले उच्चभ्रू व श्रीमंत बापांची असून फक्त नीट किंवा जेईई परीक्षेत पास होऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी धडपडत असतात. त्यांपैकी पास होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची या मुलांची व त्यांच्या पालकांची तयारी असते. मोठमोठाल्या कोचिंग क्लासशी संबंध असलेले दलाल व या दलालांची राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्यासोबत असलेला वावर या सर्व बाबींचा असलेला ताळमेळ व त्यामधून अशा प्रकारच्या संबंधातून पेपर फुटीची प्रकरणे उदयास येतात, असेही शेणफडराव घुबे म्हणालेत.Student activists detained amid NEET protest outside Kishan Reddy's 's  residence‘नीट’च्या पेपरफुटीचे हे प्रकरण अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर पोहेाचले असून, सरासरी १५ हजार विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे. याचाच अर्थ १५ हजार विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या या प्रकरणाचा लाभ घेऊन पाहिजे तेवढे गुण मिळविण्यात यशस्वी झाले असावेत. मग नीट किंवा जेईईच्या परीक्षेत बसलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांचे काय? प्रामाणिकपणे अभ्यास करून गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांवर हा सरळसरळ अन्यायच नाही का? यावर्षी हे प्रकरण कोटा येथून बाहेर येऊन लातूरमध्ये त्याचे धागेदोरे जुळले. हे प्रकरण आता बाहेर आलेले असले तरी गेल्या १०-१५ वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे एकूणच चौकशीतून निष्पन्न होईल. नीटच्या परीक्षेतून पास झालेले हे विद्यार्थी कोणत्या दर्जाचे डॉक्टर घडत असतील, याचा तर विचार करणेसुद्धा मनाचा थरकाप उडविणारी बाब आहे. एकदा का नीटची परीक्षा पास होऊन मेडिकलला नंबर लागला की मेडिकलच्या परीक्षेत पास होणे, ही बाब या विद्यार्थ्यांसाठी अजिबात अशक्य नाही. कारण नव्यानेच मान्यता मिळालेली मेडिकल कॉलेज व या संस्थांचे व्यवस्थापन व त्यामधील प्राध्यापकवर्ग आपल्या कॉलेजचा निकाल उत्कृष्ठ लागावा, यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे सहजरित्या पास होऊन एमबीबीएसची डिग्री मिळविणे आपल्या देशात अशक्य मुळीच नाही, असा निष्कर्ष नीटच्या पेपरफुटी प्रकरणातून काढावयास हरकत नाही. बोगस मेडिकल कॉलेज, बोगस डॉक्टर, बोगस इंजिनिअरिंग कॉलेज, बोगस इंजिनिअर त्यामुळे ऑपरेशन टेबलवर पेशंट मरणे किंवा रेल्वे व विमान अपघातात हजारो माणसे मरणे ही बाब भारतीयांसाठी नवीन नाही. यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जातो, या बाबीशी राजकारण्यांना काहीही देणेघेणे नाही. जो जीवाने जातो त्याचे यांना ना सोयर ना सुतक! मग मेडिकलला नंबर लागेल या भाबड्या आशेने लातूर, नांदेड किंवा कोट्याला जाऊन नीटमध्ये किंवा जेईईमध्ये अपात्र झालेल्यांचे काय? तेंव्हा जरा डोळे उघडा, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी खंतही शेणफडराव घुबे यांनी व्यक्त केली.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!