Breaking newsDEULGAONRAJAHead linesMaharashtraMarathwada

राँगसाईड जाणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने भरधाव इर्टिगाला उडविले; सात जण जागीच ठार, ५ जण अत्यवस्थ!

– मृतांमध्ये देऊळगावराजा तालुका व मुंबईच्या मालाड येथील प्रवाशांचा समावेश, घटनास्थळी बराचवेळ मृतदेह पडून!

देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँगसाईड येणार्‍या कारने दुसर्‍या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून, सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांची ओळख पटली आहे. मुंबईतील मालाड भागातील मन्सुरी कुटुंबातील तिघांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला, तर देऊळगावराजा तालुक्यातील उमरखेड येथील दोघांचा तर पिंपळगाव बुद्रूक येथील एकाचा मयतांमध्ये समावेश आहे. चार गंभीर जखमीवर छत्रपती संभाजीनगरच्या तर एकावर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३५१ वर रात्री ११ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. नागपूरकडून मुबंईकडे जाणार्‍या इर्टिगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर पोलिस व बचाव पथक उशिरा आल्याने रात्री बराचवेळ घटनास्थळी मृतदेह पडून होते. तसेच, पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरूळीत झाली होती. मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग हा अपघाताचा मार्ग बनला आहे. एक दिवसाआड या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत.

जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की, दोन्ही वाहने चक्काचूर झालीत. स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर इर्टिगा कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्या होत्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. एमएच १२ एमएफ १८५६ मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने या कारने नागपूरकडून मुंबईकडे जाणार्‍या इर्टिगा कार क्रं. एमएच ४७ बीपी ५४७८ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना जालन्यातील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत, बचाव व मदतकार्य करत, रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पण हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचुर झाला होता.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांची ओळख पटली असून, मुंबईतील मालाड भागातील मन्सुरी कुटुंबातील तिघांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला, तर देऊळगावराजा तालुक्यातील उमरखेड येथील दोघांचा तर पिंपळगाव बुद्रूक येथील एकाचा मयतांमध्ये समावेश आहे. चार गंभीर जखमीवर छत्रपती संभाजीनगरच्या तर एकावर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईच्या मन्सुरी कुटुंबातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील इर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना, हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या ४ ते ५ फूट खाली कोसळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.————

– अपघातातील मृत व्यक्तींची नावे –

– फय्याज शकील मन्सुरी, फैजल शकील मन्सुरी, अल्थमेश मन्सुरी (सर्व रा. मालाड मुंबई पूर्व, आर्टिका कार क्र. एमएच ४७ आरपी ५४७८ मधील), प्रदीप लक्ष्मण मिसाळ वय ३८ वर्ष रा. पिंपळगाव, ता. देऊळगावराजा, संदीप माणिकराव बुधवंत वय ३० वर्ष (कार चालक), विलास सुदान कायंदे वय २८ वर्ष रा. उमरखेड, ता. देऊळगावराजा (स्विफ्ट कार क्रमांक एमएच १२ एमएफ १८५६ मधील).
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!