SINDKHEDRAJA

आडगावराजाच्या उपसरपंचपदी श्याम काळे बिनविरोध

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील आडगावराजा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्या जागेसाठी आज, दिनांक २४ जूनरोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रंजना संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य श्याम काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने उपसरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामसेवक चंद्रकांत बोरुळ यांनी जाहीर केले.

यावेळी मावळत्या उपसरपंच सौ. कासाबाई मानसिंग कहाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक कहाळे, पांडुरंग शिंदे, सौ. अरुणा नीलेश शिनगारे, सौ गंगूबाई रुस्तुमराव झोरे, सौ.जनाबाई गैबी राठोड यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर गावातील नागरिकांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्याम काळे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!