Head linesSINDKHEDRAJAVidharbha

प्रभारी सचिवामुळे अंत्रीखेडेकर येथील विकासकामे खोळबंली!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – चिखली पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत कार्यालय अंत्री खेडेकर येथील ग्रामसचिव यांना कायमस्वरूपी प्रभार मिळत नाही, म्हणून अंत्री खेडेकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सुनिताताई मोरे यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
उपसरपंचांनी दिलेले पत्र.

याबाबत चिखली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की गट विकास अधिकारी चिखली हे पद सहा वर्षांपासून कायम स्वरूपात रिक्त आहे. त्यामुळेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. तसेच अंत्रीखेडेकर ग्रामपंचायत कार्यालयात संपूर्ण प्रभार असेल, असे सचिवपदी कायम देण्यात आले नाहीत. दप्तर दिरंगाई होत आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, दोन वर्षांत नालेसफाई नाही. पावसाळ्यात साथीचे आजार आल्यास शासन जबाबदार आहेत. विकासकामे बंद आहेत. विस्तार अधिकारी भेट देत नाहीत. अनेक पत्र दिले पण आजपर्यंत शासनाकडून कारवाई करण्यात येत नाहीत. त्यामुळेच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय, अंत्री खेडेकर सौ.सुनीता भास्कर मोरे या दि.१५ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत आमरण उपोषणास चिखली तहसीलदार कार्यालयासमोर बसणार आहेत. वारंवार तक्रारी करूनसुद्धा पंचायत समितीचे कोणतेही अधिकारी तक्रारीकडे लक्ष देत नाही, हे सर्व प्रभारी पदाचे लक्षणे आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!